
संरक्षक भिंतीसोबतच पत्र्याचे शेड, नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था, विद्युत पोल, सुरक्षा गेट यांची दुर्दशा झाली आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीतनसुद्धा प्रशासनातर्फे दशक्रिया घाटाची दुरुस्ती केलेली नाही. तसेच, कोणत्याही पर्यायी उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील काही वर्षापासून या दशक्रिया घाटावर आंबेगावमधील नागरिक धार्मिक विधी करत आहेत.
कात्रज (ता. ०१) : आंबेगावमधील गायमुख दशक्रिया घाटाची दुरावस्था झाली असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गतवर्षी २५ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टीमध्ये जांभुळवाडी तलावातून उगम पावणाऱ्या ओढ्याला पूर आल्याने आंबेगाव खुर्द आणि आंबेगाव (बु) परिसरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यापैकीच आंबेगाव (बु)मधील गायमुख चौक येथील दशक्रिया घाटाचे नुकसान होऊन संरक्षक भिंती पडल्या होत्या. परंतु, वर्ष झाले तरी या भिंतीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. भिंती पडल्याने जवळूनच रहदारीचा रस्ता असल्याने घाटावर चाललेल्या विधी बाहेरील नागरिकांना दिसत असल्याचेही नागरिक सांगतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
संरक्षक भिंतीसोबतच पत्र्याचे शेड, नागरिकांसाठीची बैठक व्यवस्था, विद्युत पोल, सुरक्षा गेट यांची दुर्दशा झाली आहे. परंतु, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून कोरोनासारख्या महामारीच्या परिस्थितीतनसुद्धा प्रशासनातर्फे दशक्रिया घाटाची दुरुस्ती केलेली नाही. तसेच, कोणत्याही पर्यायी उपाययोजना केलेल्या नाहीत. मागील काही वर्षापासून या दशक्रिया घाटावर आंबेगावमधील नागरिक धार्मिक विधी करत आहेत. परंतु, गेल्या वर्षभरापासून दशक्रिया घाटाची दुरावस्था झाल्याने नागरिकांची गैरसोय असल्याचे चित्र आहे.
आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द या परिसराचा तीन वर्षापूर्वी महापालिकेत समावेश झाला. मात्र, महापालिका समावेशनांत्तर कोणताही ठोस विकासनिधी या भागासाठी मिळाला नसून पडझड झालेल्या दशक्रिया घाटाचीही दुरुस्तीही होत नसल्यानेही भागातील नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
पदवीधर, शिक्षकांना मतदानासाठी विशेष रजा मंजूर होणार - शिक्षणाधिकारी
''आंबेगाव (बु) परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, धार्मिक विधीसाठी उपस्थित असणाऱ्या नागरिकांची संख्या देखील जास्त असते, सोयी - सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या घाटाचे काम होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, परंतु प्रशासन याची दखल घेत नाही. ''
- युवराज बेलदरे, स्थानिक नगरसेवक
कापुरव्होळ ज्वेलर्स दरोड्यासह चौदा गुन्ह्यातील आरोपी ताब्यात