#SaathChal दिंडीप्रमुखांना यंदा महापालिका खर्चाने भेटवस्तू देण्यास नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

पिंपरी : "उच्च न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या सूचना लक्षात घेता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीप्रमुखांना यंदा महापालिका खर्चाने भेटवस्तू दिल्या जाणार नाही. सर्व गटनेत्यांची सोमवारी बैठक घेऊन नगरसेवकांच्या एक महिन्याच्या मानधनातून वारकऱ्यांना भेटवस्तू देण्याबाबत विचारविनिमय केला जाईल. भाजपचे खासदार, आमदार देखील त्यासाठी मानधन देण्यास तयार आहेत'', अशी माहिती सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शनिवारी दिली. 

दिंडीप्रमुखांना भेटवस्तू देण्याचा विषय हा दरवर्षी चर्चिला जातो. राष्ट्रवादीच्या काळात गाजलेले विठ्ठल मूर्ती खरेदी प्रकरण, गेल्या वर्षी ताडपत्री खरेदीवरून झालेला गदारोळ या बाबी लक्षात घेता यंदा सत्ताधारी भाजपने फुंकून पाऊल उचलण्याचे धोरण ठेवले आहे. त्यातही उच्च न्यायालय व राज्य सरकारचे निर्देश असल्याने महापालिकेच्या खर्चाने दिंडीप्रमुखांसाठी भेटवस्तू खरेदी करण्याचे धोरण बाजूला ठेवण्यात आले आहे. 

पवार म्हणाले, "संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखीसोबत येणाऱ्या दिंडीप्रमुखांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू खरेदीवरून भ्रष्टाचाराचे आरोप होतात. त्यामुळे महापालिकेच्या खर्चाने भेटवस्तू देण्यापेक्षा वारकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्याचे धोरण आम्ही ठेवले आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेच्या खर्चाने वारीसाठी स्वागतकक्ष उभारले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. नगरसेवकांच्या खर्चाने संबंधित स्वागतकक्ष उभारले जातील. वारकऱ्यांसाठी 500 फिरती शौचालये, औषधोपचार, स्वच्छ पाणी, राहण्याची व अन्य व्यवस्था महापालिकेतर्फे चांगल्या पद्धतीने दिली जाईल. त्यामध्ये आम्ही कमी पडणार नाही. देहू, आळंदी संस्थानाने देखील भेटवस्तूंपेक्षा वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी केली आहे.'' 

Web Title: pmc Refuse to donate gifts to the Dindi pradhan this year