बेकायदा नळजोडणी घेणाऱ्यांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

पुणे - शहर आणि उपनगरांमध्ये बेकायदा नळजोड असल्याच्या तक्रारी सातत्याने येत असून, अशा नळजोडणीचा शोध घेऊन संबंधितांवर कठोर कारवाईची मोहीम महापालिका प्रशासनाने आखली आहे. याआधीही अशा प्रकारची मोहीम आखून फारशी कारवाई न झाल्याने प्रशासनाची ही मोहीमही केवळ उपाययोजनांचा भाग समजला जात आहे. विशेषत: हॉटेल आणि अन्य व्यावसायिकांकडे बेकायदा नळजोड असल्याचे महापालिकेच्याच पाहणीत आढळून आले आहे. 

मुख्यत: उपनगरांमधील नागरीकरण वाढल्याने बेकायदा नळजोड घेण्याचे प्रमाण वाढले असून, राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीमुळे परवानगी न घेताच जलवाहिन्या टाकून घरे आणि सोसायट्यांमध्ये पाणी घेण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने महापालिकेच्या वतीने पाणीबचतीच्या उपाययोजना आखण्यात येत आहेत. पाण्याची नासाडी विशेषत: त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर होऊ नये, याकरिता बंधने घालण्यात आली आहेत. तरीही बहुतांशी भागात सर्रास पिण्याच्या पाण्याचा गैरवापर होत असल्याचे उघड झाले आहे. या ठिकाणांची पाहणी करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. दुसरीकडे मात्र उन्हाळ्यामुळे पाण्याचा दाब कमी झाल्याने घरे आणि सोसायट्यांमध्ये बेकायदा जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा घेतला जात असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नळजोडणीची कामे कुठे सुरू आहेत, त्याकरिता परवानगी आहे का, नेमकी परवानगी याची तपासणी करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा खात्याने सांगितले. 

काही भागांत बेकायदा नळजोडणी घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची खातरजमा करून ही कारवाई करण्यात येईल. बेकायदा नळजोड घेणाऱ्याविरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई होईल. 
व्ही. जी. कुलकर्णी, खातेप्रमुख, पाणीपुरवठा विभाग, महापालिका 

Web Title: PMC take action on illegal water connection