पुण्यातील आणखी २२ भाग सील होणार? महापालिका आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र!

Corona-Seal-Pune
Corona-Seal-Pune
Updated on

पुणे : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. लॉकडाऊन आणि इतर उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आल्यानंतरही कोरोनाचा फैलाव रोखण्यात पुणे प्रशासनाला अपयश आले.

या पार्श्वभूमीवर कोरोनाला त्वरीत आळा घालण्यासाठी आणखी २२ ठिकाणे सील करण्यात येणार आहेत. याबाबतचे पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. आता आणखी २२ भाग सील करण्यात येणार आहेत. यामध्ये बहुतांश भाग हा दाट लोकवस्ती आणि झोपडपट्टी परिसर असणारा आहे़.

पालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सोमवारी (ता.१३) सादर केला. हे भाग पूर्णपणे सील करण्यापूर्वी आवश्यक पोलिस बळ उपलब्ध आहे का? याची चाचपणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात येत आहे. तसेच पोलीस यंत्रणेकडून याबाबतचा अहवाल आल्यावर हे २२ भाग सील करण्याबाबतचा निर्णय अंमलात आणला जाणार आहे़.

सील करण्यात येणारी २२ ठिकाणे पुढीलप्रमाणे :
१) प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. १ ते ४८, ताडीवाला रोड प्रभाग क्र. २०
२) संपूर्ण ताडीवाला रोड
३) घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र.२
४) राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टँड, संत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. २०
५) विकासनगर, वानवडी गाव
६) लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड
७) चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. २६ व २८
८) घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड
९) संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८
१०) सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. २३, २४व २६

११) पर्वती दर्शन परिसर
१२) सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट
१३) संपूर्ण पाटील इस्टेट परिसर
१४) संपूर्ण भोसलेवाडी परिसर व वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. ७
१५) एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. २६
१६) संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर
१७) वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. ५
१८) धानोरी प्रभाग क्र. १
१९) येरवडा प्रभाग क्र. ६ आणि विमानगर प्रभाग क्र. ३ 
२०) पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी,
२१) कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजूस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टँड 
२२) पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com