esakal | Lockdown : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; पेठा करणार सील!
sakal

बोलून बातमी शोधा

PMC

कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू द्यायची नसेल, तर निर्बंध घालण्याशिवाय पर्याय नसल्याचेही आयुक्तांनी निक्षून सांगितले.

Lockdown : पुणे महापालिकेचा मोठा निर्णय; पेठा करणार सील!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुण्यातील जुन्या पेठांमध्ये कोरोनाचे 37 रुग्ण सापडल्याने पेठांचा भाग सील करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने सोमवारी (ता.६) घेतला. तसेच कोंढवा भागातही अशीच प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आकडा वाढण्याला अटकाव करण्यासाठी सीलिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांचे म्हणणे आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोणता भाग सील करण्यात येणार आहे, याचा निश्चित नकाशा पुणे पोलिसांकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे.
एकाच भागातील व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

- Coronavirus : २४ तासांत कोरोनाच्या ६९३ नव्या केसेस; तबलिगींच्या संपर्कात...

गुलटेकडी ते आरटीओ दरम्यानचा भाग सील करण्यात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना शंभर टक्के मास्क वापरण्याचे बंधन करण्यात आले आहे. तसेच त्यांना बाहेर पडण्यावर आणि प्रवास करण्यावर बंधणे घालण्यात आली आहेत. सील करण्यात आलेल्या भागातील कोणालाही विनाकारण घराबाहेर पडता येणार नाही. गुलटेकडी मार्केटयार्डचा भाग सील करण्यात येणार असला तरी येथील भाजीपाला बाजार सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

- महाराष्ट्रात लॉकडाऊन उठवायचा की नाही? राजेश टोपेंचे स्पष्ट संकेत, म्हणालेत...

दरम्यान, पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात 100 कोरोनाग्रस्त दाखल झाले आहेत. तेथील क्षमता संपल्याने आता औंध येथील रुग्णालयात नव्या रुग्णांना हलविण्यात येणार आहे. जरी रुग्णांची संख्या 25 हजारापर्यंत वाढली, तरी पुणे महापालिकेची त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू द्यायची नसेल, तर निर्बंध घालण्याशिवाय पर्याय नसल्याचेही आयुक्तांनी निक्षून सांगितले.

- Fight with Corona : राष्ट्रपती, पंतप्रधानांसह खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात; केंद्र सरकारचा निर्णय

मरकझमध्ये गेलेले ३० कोरोनाग्रस्त पुण्यात दाखल झाले आहेत. तर पुण्यात आतापर्यंत ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७८१ एवढी झाली आहे.