पुणे मनपाचे तिघे ठेकेदार काळ्या यादीत

महापालिकेकडून कारवाई; कामे केली नसतानाही बिल अदा
PMC-Pune.jpg
PMC-Pune.jpgsakal

पुणे : प्रत्यक्षात काम कमी आणि त्याची बिले अधिकच्या रकमेने लाटल्याप्रकरणी भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून (Bhavani peth Regional Office)अखेर तीन ठेकेदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. मे. रेणुका एंटरप्रायझेस, मे. गणेश प्रोपरायटर आणि मे. सद्गुरू एंटरप्रायझेस अशी या तीन ठेकेदार कंपन्यांची नावे आहेत. (Pmc blacklist 3 contractor)

एकीकडे ठेकेदारांवर कारवाई करताना दुसरीकडे मात्र महापालिका प्रशासनाने (Pune muncipal corporation) यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कोणतीच कारवाई न केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. भवानी पेठ येथील कार्यालयांतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल झाली होती.

PMC-Pune.jpg
पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

त्या तक्रारीची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने तपासणी केली असताना अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस आले. त्यात जागेवर काम कमी केले असतानाही संबंधित ठेकेदारांना जादा बिल अदा करणे, एकच कामासाठी दोनदा निधी खर्च करणे असे अनेक प्रकार तपासणीत आढळून आले होते. अखेर प्रशासनाने या प्रकरणी तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले.

दोन फायली गायब?

एकूण सहा कामांत अनियमितता आढळून आली आहे. मात्र चौकशीमध्ये त्यापैकी चार कामांच्या फायली आढळून आल्या आहेत. तर दोन कामांच्या फायली गायब झाल्या आहेत. प्रत्यक्ष काम न करताच शंभर टक्के बिल अदा करण्यात आले असल्याच्या या फायली आहेत. त्यामुळे चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनादेखील त्या उपलब्ध शकल्या नाहीत, अशी चर्चा महापालिका वर्तुळत सुरू होती.

PMC-Pune.jpg
पूनर्वसन प्रस्ताव तयार; लवकरच नवीन ठिकाणी वसणार तळीये गाव

अधिकाऱ्यांची पाठराखण

महापालिका प्रशासनाने ठेकेदारांवर कारवाई केली खरी; परंतु त्यामध्ये काही अधिकऱ्यांचादेखील समावेश आहे. त्यांच्यावर मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई का करण्यात आली नाही. केवळ ठेकेदारांवर दोष टाकून महापालिका प्रशासनाने हात वर केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कामात अनियमितता आढळून आल्याने मे. रेणुका एंटरप्रायझेस, मे. गणेश प्रोपरायटर, मे. सद्गुरू एंटरप्रायझेस या तीन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले आहेत.

-अविनाश सपकाळ, उपायुक्त, परिमंडल ५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com