esakal | 'कुठे तक्रार करायची तेथे कर...', PMCच्या पार्किंगमध्ये कामगारांचीच दहशत
sakal

बोलून बातमी शोधा

Pune PMC

'कुठे तक्रार करायची तेथे कर...', PMCच्या पार्किंगमध्ये कामगारांचीच दहशत

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : महापालिकेच्या वाहनतळांमध्ये सर्रासपणे नागरिकांची लूट सुरू आहे, गाडी लावण्यासाठी किती पैसे द्यायचे याचा फलक कुठेही लावलेला नसतो. याबाबत चौकशी केली ''कुठे तक्रार करायची आहे तेथे कर आम्हाला फरक पडत नाही'' अशी उत्तरे देऊन दहशत निर्माण केली जाते. वाहनतळाचा ठेका देऊन महापालिकेची जबाबदारी संपत नाही तर त्यांनी त्याच्या कार्यपद्धतीवर देखील लक्ष दिले पाहिजे.

‘सकाळ’ने आज (बुधवारी) बाबू गेनू वाहनतळावर तिप्पट भाडे घेतले जात असल्याचा प्रकार समोर आणला. या ठिकाणी नागरिकांना अधिकृत माहिती मिळावी अशी व्यवस्थाच नाही. याबाबत नागरिकांनी ‘सकाळ’कडे त्यांच्या तक्रारी केल्या.

हेही वाचा: तुमचा मुलगा सापडला; आई-वडीलांची पोलिसात तक्रार देतानाच आला फोन

बाबू गेनू पार्किंग मध्ये ठेकेदाराच्या लोकांची दादागिरी नेहमीच असते. तेथे कोठेही पार्किंगची माहिती देणारा बोर्ड नाही. हीच तऱ्हा हमालवाडा पार्किंगची पण आहे. प्रति तासाला २० रुपये घेतले जातात. महापालिकेकडे दोन वेळा तक्रार करूनही काही झाले नाही.बाबू गेनू पार्किंगमधील कामगार कुठेही तक्रार कर आम्हाला काही फरक पडत नाही, अशी दादागिरी करतात असे एका वाचकाने कळविले आहे.

हेही वाचा: Pune : बरयं २१ दिवसासाठी फिरते हौद घेतले नाहीत

हा विषय फक्त मंडई पार्किंग पुरता मर्यादित नाही. शहरातील सर्व पार्किंग मध्ये हेच चालू आहे. कोणी साधा माणूस या पार्किंग माफिया विरोधात तक्रार करण्यासाठी लवकर पुढे येत नाही. १०, २० रुपयांसाठी वाद ओढवून घेणे परवडत नाही. कोणी तक्रार केली तरी पालिका कारवाई साठी टाळाटाळ करते.हा प्रकार थांबवण्या साठी निविदेतील अटीशर्थी कडक केल्या पाहिजेत, पार्किंगचे दर दर्शनीय भागात लावले पाहिजेत. ‘सकाळ’ने या विषयावर आवाज उठवला या बद्दल खूप आभार, अशी प्रतिक्रिया एका वाचकाने दिली आहे.

पालिकेचे अधिकारी, नगरसेवक आणि ठेकेदार यांची मिलिभगत आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की आम्ही चौकशी करू असे उत्तर देतात पण पुढे काही होत नाही. खरे तर या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबीत केले आणइ ठेकेदारावर कडक कारवाई केल तरच हे प्रकार थांबतील अशी संतप्त प्रतिक्रिया एका वाचकाने दिली.

loading image
go to top