esakal | Pune : बरय २१ दिवसासाठी फिरते हौद घेतले नाहीत
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : बरयं २१ दिवसासाठी फिरते हौद घेतले नाहीत

Pune : बरयं २१ दिवसासाठी फिरते हौद घेतले नाहीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विसर्जन हौदासाठी केवळ चार दिवसाची निविदा काढता येत नाही असा खुलासा महापालिका प्रशासन करत असल्याने पुणेकरांनी यावर चांगलीच फिरकी घेतली आहे. पुण्यात काही जण २१ दिवसांनी गणपतीचे विसर्जन करतात. म्हणून २१ दिवसांसाठी फिरत्या हौदाची निविदा काढली नाही हे बरय, अशा शब्दात कान टोचले आहेत. तर इतर वाचकांनी या निर्णयावर टीका करत सुविधेच्या नावाखाली धूळफेक सुरू आहे अशी टीका केली आहे.

विसर्जन हौदासाठी महापालिकेने ११ दिवसांसाठी तब्बल १.२६ कोटी रुपयांची निविदा मान्य केली आहे. ज्या ठेकेदाराला हे काम दिले आहे त्याच्या सर्व गाड्या फिरल्या नसल्याचे दीड दिवसाच्या गणपती विसर्जनच्या वेळेस स्पष्ट झाले. या विषयावर पुणेकरांनी त्यांची सडेतोड मते मांडत ही कामाची पद्धत चुकीची असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा: दिल्ली पोलिसांची महाराष्ट्रात कारवाई; राज्याच्या गृहमंत्र्यांची पत्रकार परिषद

यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया

प्रणव नामेकर : महानगरपालिकेने विसर्जन हौदाची निविदा पूर्ण पणे चुकीची आहे. गरज नसताना ठेकेदाराला ७ दिवसांचे भाडे दिले जात आहे. याच्या मध्ये खूप मोठा भ्रष्टाचाराची शक्यता असून, ४ दिवसांची निविदा काढली काढली पाहिजे.

आदित्य गायकवाड : ११ दिवसांसाठी फिरते हौद घेऊन नागरिकांच्या कररूपी पैशांची उधळपट्टी केली आहे.नागरिकांची गैरसोय होऊ नये असे गोंडस कारण दिले जात असले तरी प्रत्यक्षात विसर्जनात अनेक विघ्न येत आहेत. विसर्जनाच्या ४ दिवसा व्यतिरिक्त अन्य दिवशी यातील किती फिरते हौद रस्त्यावर फिरतील हा प्रश्नच आहे. सुविधेच्या नावाखाली धूळफेक सुरू आहे.

दत्तात्रय जाधव : गणपती विसर्जन दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ आणि अकरा दिवस म्हणजे अनंत चतुर्थीपर्यंत असते. काही लोक एकवीस दिवसांनी करतात. तरी बरे या यंत्रणेने एकवीस दिवसासाठी ठेकेदार नियुक्त केला नाही. या विसर्जन नियुक्तीत भ्रष्टाचार झाल्याचा वास सूज्ञ पुणेकरांना आल्याशिवाय राहणार नाही.

उमेश वाघोदे : विसर्जनासाठी महापालिकेने केलेली ११ दिवसांची सुविधा ही फक्त ठेकेदारांची फायद्याची आहे, ठरविलेली रक्कम ही संशयास्पद आहे. हा तर निव्वळ लोकांच्या मेहनतीच्या पैशांचा चुराडा आहे

loading image
go to top