#PMCIssue  डॉक्‍टरांकडून लिहून घेतले प्रतिज्ञापत्र

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

येरवडा -  पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील खासगी रुग्णालयांमध्ये दुसऱ्यांच्या नावाने प्रॅक्‍टिस करणाऱ्या डॉक्‍टरांना आता दणका बसला आहे. नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेऊन खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. त्यांनी खासगी प्रॅक्‍टिस केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी दिली.

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील १५६ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी अनेक जण पगाराच्या ३५ टक्के ‘नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स’ घेऊन नियमबाह्य खासगी प्रॅक्‍टिस करीत असल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याची दखल घेऊन आरोग्य प्रमुखांनी महापालिकेच्या सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना एका परिपत्रकाद्वारे तंबी दिली आहे. तसेच, प्रत्येक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात आहे. 

आरोग्य विभागाने काढलेल्या परिपत्रकाद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांना खासगी प्रॅक्‍टिसला मनाई आहे. नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स घेऊन खासगी रुग्णालयात वैद्यकीय व्यवसाय केल्यास त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईला ते स्वतः जबाबदार असल्याचे लिहून घेतले जात आहे. 
   - डॉ. रामचंद्र हंकारे,  आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका.

पुन्हा प्रतिज्ञापत्राची काय गरज ! 
महापालिकेच्या आरोग्य विभागात डॉक्‍टर रुजू झाल्यास त्यांनी खासगी रुग्णालयात प्रॅक्‍टिस करू नये म्हणून पगाराच्या तब्बल ३५ टक्के नॉन प्रॅक्‍टिसिंग अलाउन्स देण्यात येतो. त्याच वेळी त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येते. खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्यांवर कारवाई करायची सोडून पुन्हा प्रतिज्ञापत्राची काय गरज आहे, अशी विचारणा काही डॉक्‍टरांनी केली आहे.

Web Title: PMCIssue Affidavit by the doctor