#PMCIssues स्वच्छतेच्या नावाखाली उधळपट्टी

ज्ञानेश सावंत
रविवार, 10 जून 2018

महापालिकेच्या रुग्णालयांतील साफसफाईचे काम ‘आउटसोर्स’ करण्यात आले आहे. त्यावर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत. अर्थात ही ‘सफाई’ म्हणजे महापालिकेच्या तिजोरीचीच...याचा शोध घेऊन वस्तुस्थिती मांडणारी ही वृत्तमालिका.  

पुणे - वरील दोन्ही रुग्णालयांची क्षमता आणि तेथील स्वच्छतेसाठी होणाऱ्या खर्चाच्या आकड्यातील तफावत पाहून तुम्ही बुचकळ्यात पडला असाल. यावरून कमला नेहरुमधील ‘साफसफाई’ सहज डोळ्यांत भरते. आता तुम्ही म्हणाल, एवढा पैसा ओतल्याने रुग्णालय किती चकाचक असेल! तुमच्यासारखा आमचाही तसाच समज होता. पण, हे पैसे ज्या कामांसाठी दिले जातात, ती होतातच असे नाही, हे महापालिकेने दिले आहे. कमला नेहरू रुग्णालयात फेरफटका मारल्यानंतर याची साक्षच पटते. अशा प्रकारे पाच हॉस्पिटलमधील स्वच्छतेच्या कामांवर महिन्याकाठी महापालिका तब्बल ५१ लाख ५१ हजार रुपयांची उधळपट्‌टी करीत असल्याचे आकडे सांगत आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार रुग्णालयांत स्वच्छता केली जाते. ती दर्जेदार व्हावी, यासाठी ठराविक यंत्रणा वापरणे बंधनकारक आहे. वेळापत्रकानुसार कामे न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येते.
- डॉ. अंजली साबणे, प्रभारी आरोग्य प्रमुख, महापालिका

ससून रुग्णालय 
क्षमता : ११०० खाटा,
स्वच्छतेवरील खर्च दरमहा : 
१२ लाख रुपये

महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय  
क्षमता : ४०० खाटा, 
स्वच्छतेचा खर्च दरमहा : 
१७ लाख ३६ हजार रुपये.

Web Title: #PMCIssues Cleaning work of municipal hospitals issue