#PMCIssues निविदांचा फुगा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

पुणे - महापालिकेची रुगणालये, नाट्यगृहे, शाळा स्वच्छतेच्या निविदांमध्ये फेरफार करून अधिकारी आपली मर्जी सांभाळणाऱ्या ठेकेदारांना कामे देत असल्याचे उघड झाले आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर अटी-शर्तींना सफाईदारपणे ‘केराची टोपली’ दाखविण्याचे धाडस प्रशासन करीत असल्याचे दिसून आले आहे. काही निविदा पाच ते दहा लाख रुपयांनी फुगविल्याचे पुरावे ‘सकाळ’कडे आहेत. 

पुणे - महापालिकेची रुगणालये, नाट्यगृहे, शाळा स्वच्छतेच्या निविदांमध्ये फेरफार करून अधिकारी आपली मर्जी सांभाळणाऱ्या ठेकेदारांना कामे देत असल्याचे उघड झाले आहे. निविदा मंजूर झाल्यानंतर अटी-शर्तींना सफाईदारपणे ‘केराची टोपली’ दाखविण्याचे धाडस प्रशासन करीत असल्याचे दिसून आले आहे. काही निविदा पाच ते दहा लाख रुपयांनी फुगविल्याचे पुरावे ‘सकाळ’कडे आहेत. 

नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी रुग्णालये, नाट्यगृहांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत; परंतु भल्यामोठ्या रकमेचे काम ठराविक ठेकेदारांना मिळवून देण्यासाठी अधिकारीच प्रयत्न करीत असतात. ठराविक ठेकेदारांची पात्रता लक्षात घेऊन, निविदांच्या अटी-शर्ती तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष कामे होतात का, ती दर्जेदार आहेत का, हे तपासण्याची यंत्रणा नसल्याने अधिकारी ठेकेदारांशी आर्थिक गुणिते जुळवून घेतात. त्यामुळे येथील स्वच्छता बिले लाटण्यापुरतीच केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा ठेकेदारांना मुदत वाढवून देण्याचा खटाटोपही करण्यात येत आहे.

चोवीस तास स्वच्छतेचा दावा
 रुग्णांची वर्दळ लक्षात घेऊन स्वच्छतेसाठी नामांकित कंपन्यांची केमिकल वापरणे बंधनकारक असल्याचे कागदोपत्री नोंदविले आहे. पण प्रत्यक्षात स्वस्तातील आणि स्थानिक बाजारपेठांमधील केमिकल वापरले जात असल्याचे दिसून आले. चोवीस तास स्वच्छता राखली जात असल्याचे ठेकेदार सांगत असले, तरी हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच कामगार तिथे नेमले आहेत. त्यांच्यावर नियंत्रण नसल्याने मनमानी काम होते. रोज सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत प्रत्येक विभाग, स्वच्छतागृहे, खिडक्‍या आदीची स्वच्छता करणे अपेक्षित आहे. 

स्वच्छतेच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी स्थानिक अधिकाऱ्यांवर आहे. त्यानुसार पाहणी करून ठेकेदार आणि त्यांच्याकडील कामगारांना सूचना केल्या जातात. शिवाय, जी यंत्रणा वापरणे बंधनकारक केले, ती वापरली जाते का, याची पुन्हा पाहणी करू.
राजेंद्र निंबाळकर, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कागदोपत्री दाखविलेल्या स्वच्छतेच्या यंत्रणा 
वेट अँड ड्राय व्हॅक्‍यूम क्‍लीनर 
कोल्ड वॉटर हाय प्रेशर वॉटर जेट 
बॅकपॅक ड्राय व्हॅक्‍यूम क्‍लीनर     
मॅन्युअल स्वीपर विथ इनबिल्ट 
व्हॅक्‍यूम क्‍लीनर  
वॉक बिहाइंड इलेक्‍ट्रिकल ऑटो स्कर्बर

Web Title: #PMCIssues PMC hospital theaters schools change in sanitation tenders