दहा तासांत पीएमपीच्या तिजोरीमध्ये ८४ लाख

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रक्षाबंधन सणाच्या दिवशी अवघ्या दहा तासांत पीएमपीला ८४ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीएमपीने प्रवाशांसाठी जादा ८८ बस उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली.  

रक्षाबंधनाच्या दिवशी पीएमपीचे उत्पन्न सर्वाधिक असते, असा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. रविवारी दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागांत पाऊस झाला. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र, सकाळच्या सत्रात पीएमपीला ८४ लाख ५६ हजार ६१५ उत्पन्न मिळाले. 

या सणानिमित्त पीएमपी प्रशासनाकडून पहाटे ५ ते दुपारी ३ वाजेपर्यंत १ हजार ६६३ बस विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पीएमपीच्या १ हजार १६०, तर खासगी भाडेत्त्वावरील ५०३ बसचा समावेश होता. दुपारी ३ वाजेपर्यंत पीएमपीला ८४ लाख ५६ हजार ६१५ रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामध्ये ८१ लाख ६३ हजार ९७५ रुपये, तर पासच्या माध्यमातून २ लाख ९२ हजार ६४० रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी रक्षाबंधनाच्या दिवसी पीएमपीला १ कोटी ९७ लाख १९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.

वकील, डॉक्‍टरांना विद्यार्थिनींकडून राख्या
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या टिळक रस्त्यावरील पूर्वप्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी वकील, डॉक्‍टर व पोलिसांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी केली. पोलिस, वकील व डॉक्‍टरांनीही या विद्यार्थिनींचे कौतुक करत त्यांना खाऊ दिला. पोलिस कर्मचारी धनंजय पाटील, सचिन खाडे, डॉ. संतोष खेडकर, ॲड. अरुणकुमार भोकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैभव जोशी, अथर्व पुंडे, रवींद्र दातीर यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे, शिक्षक आचार्य, सोळंकी उपस्थित होते.

Web Title: PMP 84 lakh income