पुण्यात रस्त्याने धावतात धूर ओकणाऱ्या पीएमपी 

राजेंद्रकृष्ण कापसे 
रविवार, 13 मे 2018

आज रविवारी सकाळी पाउणे सातनंतरच्या कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर पीएमपी बस धूर ओकत धावत होती.

शिवणे - नागरिक पहाटे सकाळच्या वेळी शुद्ध हवा मिळावी म्हणून व्यायामाला बाहेर पडले होते. परंतु आज रविवारी सकाळी पाउणे सातनंतरच्या कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर पीएमपी बस धूर ओकत धावत होती. नागरिकांच्या व मागे असलेल्या वाहन चालकांच्या अंगावर या धुराचे लोट जात होते. 

कोंढवा गेट ते वारजे माळवाडी मार्गावर एमएच 12 एफसी 3383 या क्रमांकाची कोथरुड आगारातील 1786 क्रमांकाची ही बस होती. सकाळी नागरिक मोकळ्या हवेत फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्या रस्त्यावर तर अक्षरशः धुराचे लोट गाडीच्या धुरड्यातून येत होते. तो थेट दुचाकी वाहन चालकांच्या तोंडावर मारा येत होता. वाहन चालक, रस्त्यावरील नागरिक नाकावर हात लावला होता. 
सार्वजनिक वाहन व्यवस्था सुधारली पाहिजे. तिचे आरोग्य व्यवस्थित नसेल तर नागरिकांचा प्रवास सुखकर कसा होणार किंवा अशी प्रदूषण बस करणारी मार्गावर का सोडली जातात. त्यांचावर हवा प्रदूषित करणाऱ्या वाहनावर पोलिस आरटीओ कारवाई का करीत नाही. असा प्रश्न नागरिकांना पडलाय. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: PMP air pollution make cause health issues