गेल्या पाच वर्षांत पीएमपीत आल्या फक्त १२ बस!

PMP
PMP

पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुरविणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यात २०१३ ते २०१७ दरम्यान फक्त १२ बस दाखल झाल्या आहेत, त्यामुळेच पीएमपीची दुरवस्था होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आता एक वर्षात सुमारे ९०० बस दाखल होणार असल्यामुळे पीएमपीचे चित्र बदलण्याची चिन्हे आहेत. 

पीएमपीमध्ये दरवर्षी नियमितपणे बस दाखल झाल्यास, आयुर्मान पूर्ण झाल्यामुळे बाद कराव्या लागणाऱ्या बसमुळे निर्माण होणारा खड्डा भरून निघू शकतो. या सूत्रानुसार २००३ ते २०१२ दरम्यान ११४२ बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्या. परंतु, त्यानंतर २०१८ पर्यंत अवघ्या १२ बसच दाखल झाल्या. त्यातील दोन बस स्थानिक आमदारांच्या विकास निधीतून आल्या आहेत. या कालावधीत आयुर्मान संपल्यामुळे ३०० बस बाद झाल्या, त्यामुळे पीएमपीला बसचा तुटवडा भासत गेला. परिणामी पीएमपीच्या त्याचा उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला. २०१८ मध्ये पीएमपीच्या ताफ्यात २०० मिडी बस आल्या. पाठोपाठ ३३ तेजस्विनी बस आल्या. आता पुढील वर्षात ९०० बस येणार आहेत. त्यामुळे मागील पाच वर्षांत बसचा झालेला तुटवडा काही प्रमाणात भरून निघू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com