बस विद्रूपीकरणाविरुद्ध आजोबांचा लढा!

पुणे - पीएमपी बसमध्ये लावण्यात येणाऱ्या जाहिरातींचे स्टिकर दाखविताना नीळकंठ मांढरे.
पुणे - पीएमपी बसमध्ये लावण्यात येणाऱ्या जाहिरातींचे स्टिकर दाखविताना नीळकंठ मांढरे.

पुणे - पीएमपीच्या बसमध्ये चिकटविण्यात येत असलेल्या स्टिकर्समुळे अस्वस्थ झालेले ७२ वर्षांचे एक प्रवासी गेल्या दोन वर्षांपासून पीएमपीशी संघर्ष करीत आहेत. बसचे विद्रूपीकरण केवळ पाहत न बसता, त्यांसाठी उपाययोजना कराव्यात, यासाठीही ते पीएमपीकडे आग्रह धरीत आहेत. 

पीएमपीच्या बसमध्ये वैद्यकीय उपचार, नोकऱ्या मिळवून देतो, घर बसल्या कामे देऊ, नोकरी मिळवून देऊ आदी विविध प्रकारचे स्टिकर्स लावण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. नाना पेठेत राहणारे नीळकंठ मांढरे हे त्याच्या विरोधात गेल्या दोन वर्षांपासून लढत आहे. त्यासाठी माहिती अधिकार कायद्याचा वापर त्यांनी केला आहे. प्रत्येक बस आठ दिवसांनी एकदा धुतली जाते. त्या त्या आगारांत एका दिवसात २० बस धुतल्या जातात.

बसच्या आतील बाजूस असलेले स्टिकर काढायचा असेल तर, दोन ते मिनिटे जातात. एका बसमध्ये किमान ५-१० स्टिकर तरी असतात. त्यामुळे बस धुणारे कर्मचारीही सर्व स्टिकर काढू शकत नाहीत. त्यामुळे बसचे विद्रूपीकरण कायमच राहते, असे काही आगारांना त्यांनी भेट दिल्यावर त्यांना समजले.  

मांढरे म्हणाले, ‘‘पीएमपीचे अधिकारी लाखो रुपये पगार घेतात. पण बसची देखभालही त्यांना करता येत नाही. असलेल्या कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले, तर एकही स्टिकर बसमध्ये लागू शकत नाही.’’ 

या बाबत प्रभारी जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड म्हणाले, ‘‘बस धुताना स्टिकर काढले जातात. आगारांमध्ये सुरक्षारक्षक बसची देखभाल करतात. परंतु बस मार्गावर धावत असताना काही वेळा वाहकाच्या नकळत स्टिकर लावले जातात. या बाबत पोलिसांकडेही तक्रार केली जाते.’

काचा बदलण्याच्याही सूचना
मांढरे हे स्टिकरविरुद्धच लढत नाहीत, तर ड्रायव्हरच्या समोरील काचेला तडे गेलेल्या बसचे क्रमांक त्यांनी नोंदविले आहेत. अशा बारा बसच्या काचा तातडीने बदला, अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाला केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com