#PuneDarshan  ‘पीएमपी’च्या ‘पुणे दर्शन’ सेवेला घरघर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पुणे - शहरातील वारसा व पर्यटनस्थळे पर्यटकांना एकाच फेरीत बघता यावीत, या उद्देशाने सुमारे २५ वर्षांपूर्वी पीएमपीने ‘पुणे दर्शन’ सेवा सुरू केली. मात्र, अलिकडे पर्यटकांनी या सेवेकडे पाठ फिरवल्याने सध्या केवळ एकच बस धावत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

पर्यटनासाठी पुण्यात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना एकाच दिवसात शहरातील मंदिरे, वाडे, उद्याने, संग्रहालये, ऐतिहासिक वास्तू अशी विविध १३ स्थळे ‘पुणे दर्शन’च्या माध्यमातून बघता येतात. त्यासाठी पीएमपीने दोन वातानुकुलित बसची व्यवस्था केली आहे. पुणे स्टेशन व डेक्कन अशा दोन ठिकाणांवरून सुटणाऱ्या या बस सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत पर्यटकांना ‘पुणे दर्शन’ घडवितात. या बसमध्ये एक गाइड असतो, जो सर्व स्थळांची माहिती पर्यटकांना देतो. 

या पूर्वनियोजित स्थळांव्यतिरिक्त पर्यटकांना शहर परिसरातील ठिकाणी जायचे असल्यास पीएमपीकडून सहलींचे आयोजन केले जाते. यात सिंहगड, बनेश्‍वर, आळंदी यांसह अनेक ठिकाणांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी ही सुविधा नुकतीच अद्ययावत करण्यात आली आहे. सण व सुट्यांच्या दिवशी भरभरून प्रतिसाद लाभणाऱ्या या सेवेकडे इतर दिवशी मात्र, पर्यटक कमी प्रमाणात फिरकत आहेत. त्यामुळे या सेवेला घरघर लागली आहे.

‘पुणे दर्शन’चा प्रतिसाद वाढविण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. पर्यटकांच्या मागणीनुसार सहलींचे नियोजन करून देत आहोत. तरीही अपेक्षित प्रतिसाद नाही.
-सुनील गवळी, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP BUS Pune Darshan

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: