पीएमपी बस धावताहेत विरुद्ध दिशेने

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

सिग्नल बंदच
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सिग्नल आहेत. मात्र, ते अनेक महिन्यांपासून बंद असल्याने त्याचा उपयोग होत नाही. या चौकाजवळच लहान मुलांसाठीची शाळा आहे. मुलांना ने-आण करण्यासाठी पालकांचीही गर्दी असते. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका संभवतो.

पिंपरी - पीएमपीच्या वतीने बीआरटी मार्गातून जाणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करण्यात येते. मात्र, चिंचवड गावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पीएमपीच्याच बस विरुद्ध दिशेने येत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. याकडे वाहतूक पोलिस दुर्लक्ष करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चिंचवड गावात शहीद अशोक कामटे बस स्थानकातून कात्रज, भेकराईनगर, पुणे महापालिका, वाल्हेकरवाडी आदी ठिकाणी ७२ बस रोज ये-जा करतात. याच बस स्थानकामागील स्थानकातून भोसरी, पुणे स्टेशन, पुणे महापालिका, आळंदी या ठिकाणी २४ बसची ये-जा असते. 

शरद पवारांच्या हत्येचा कट? पोलिसांत तक्रार, 'सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान'

चापेकर चौकातून कामटे बस स्थानकात येणाऱ्या पीएमपी बस वळसा घालून बस स्थानकात येणे अपेक्षित आहे. मात्र, काही बसचालक विरुद्ध दिशेने बस स्थानकाकडे वळतात. त्यामुळे चिंचवड गावातील पॉवर हाउस चौकातून लिंक रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांना डॉ. आंबेडकर चौकात येताना समोरून येणाऱ्या बसचा सामना करावा लागत असल्याने अपघाताचा धोका संभवतो. कामटे बस स्थानकालगतच महापालिकेच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहतूक नियंत्रक बसतात; तर वरच्या भागात वाहतूक पोलिसांचे कार्यालय आहे. तरीही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवीत वाहन चालविणाऱ्या पीएमपी बसचालकांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात येत नाही. विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसमुळे कोंडी होते. सकाळी कामाला जाण्याच्या घाईच्या वेळेत अशा घटना घडत असल्याने चालकांमध्ये वाद होतात. 

चापेकर चौकातून डॉ. आंबेडकर चौकाकडे येतानाच्या मार्गावर दोन्ही बाजूला वाहने लावल्यामुळे काही वेळेस पीएमपी बस उभ्या करणेही अवघड होते; तसेच केशवनगरहून सरळ डॉ. आंबेडकर चौकाकडे येण्यास वाहनचालकांना मनाई आहे. तरीही या नियमाचे उल्लंघन होते. मात्र, वाहतूक पोलिसांकडून कधीच ठोस कारवाई होत नाही. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी; तर एक स्कूलबसही याचमार्गे येऊन लिंक रस्त्याकडे वळाली. सुदैवाने यादरम्यान अपघात झाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The PMP bus runs in the opposite direction