महिलांसाठी सुरू केलेली ‘तेजस्विनीतून मोफत प्रवास’ ही योजना पीएमपीने गुंडाळली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tejaswini Bus

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पीएमपीने २०१८ मध्ये महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू केली होती.

महिलांसाठी सुरू केलेली ‘तेजस्विनीतून मोफत प्रवास’ ही योजना पीएमपीने गुंडाळली

पुणे - मोठ्या थाटात खास महिलांसाठी (Women) सुरू केलेली ‘तेजस्विनीतून मोफत प्रवास’ (Tejaswini Free Journey) ही योजना पीएमपीकडून (PMP) गुंडाळण्यात आली आहे. कोरोनामुळे बंद पडलेली ही योजना सुरू होईल, अशी आपेक्षा महिलांना होती. मात्र ही योजनाच बंद असल्याने मोफत प्रवास करता न आल्याने महिलांना प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पीएमपीने २०१८ मध्ये महिलांसाठी ‘तेजस्विनी’ बससेवा सुरू केली होती. यासोबतच दर महिन्याच्या आठ तारखेला मोफत प्रवास देण्याचे ही ठरविण्यात आले होते. पीएमपीने याची जाहिरातबाजीही चांगलीच केली होती. कोरोनामुळे सर्व काही बंद झाले. सर्व सुरळीत होताच ही योजना सुरू होण्याची आपेक्षा महिलांना होती. मात्र, आता ही योजनाच बंद केल्याने महिला दिनीनिमित्तने महिलांना मोफत प्रवास करता आला नाही.

हेही वाचा: पुणे : मोफत जलद न्यायासाठी १२ मार्चला राष्ट्रीय लोकअदालत

शहरातील दहा मार्गावर ३० बसमार्फत तेजस्विनीची सेवा देण्यात येत होती. आता फक्त सुमारे १८ ते २० बस सेवेत आहेत. त्यामुळे ही सेवा आता गुंडाळण्यात आली आहे, असे दिसून येत आहे.

दोन महिन्यांपूर्वीच पीएमपी बससेवा सुरळीत झाली आहे. त्यामुळे मोफत प्रवास या योजनेचा विचार झाला नाही. त्यामुळे ही योजना राबवता आली नाही.

- दत्तात्रेय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

Web Title: Pmp Closed Free Journey Through Tejaswini Scheme For Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :womenJourneyPMP Bus