पीएमपी चालकांकडून २० लाखांची इंधनबचत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 जून 2019

इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे.

पुणे -  इंधनबचतीबरोबरच पर्यावरण संवर्धनाशाठी काम करणारी पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशन (पीसीआरए) या संस्थेच्या मदतीने पीएमपी प्रशासनाने इंधनात मोठी बचत केली आहे. गेल्या आठ महिन्यांत पीएमपी बसचालकांनी २० लाख रुपयांचे इंधन वाचविले. यासाठी पीएमपी बसचालकांना तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले होते. 

केंद्र सरकारच्या ‘पीसीआरए’च्या साहाय्याने पीएमपीत ‘इंधनबचत’ उपक्रम राबविण्यात आला. यानुसार पीएमपीच्या मार्केट यार्ड आणि कात्रज आगारातील चालकांना इंधनबचतीचे धडे देण्यात आले होते; तसेच बसची देखभाल-दुरुस्ती आणि सुरक्षित वाहन चालविण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. ऑक्‍टोबर २०१८ मध्ये हा उपक्रम सुरू झाला. तेव्हापासून आजपर्यंत दोन्ही डेपोंमिळून २० लाख रुपयांची इंधनबचत केली. यामध्ये मार्केट यार्ड आगार ११ लाख, कात्रज आगारात नऊ लाख रुपयांची बचत झाली. इंधनबचत उपक्रम ऑक्‍टोबर २०१९ पर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP drivers save fuel cost of Rs 20 lakh