'पीएमपी'वर मुंढे यांची पूर्णवेळ नियुक्ती - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मार्च 2017

पुणे - 'पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) अध्यक्षपदी तुकाराम मुंढे यांची पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे,'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मात्र ते पदभार का घेत नाहीत, यावर, "असे प्रश्‍न मला विचारणे योग्य नाही,' अशा शब्दांत त्यांनी उत्तर देणे टाळले. त्यामुळे पीएमपीचा पदभार मुंढे घेणार की नाही, याची उत्सुकता लागून राहिली आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पीएमपीच्या अध्यक्षपदी मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पीएमपीचा पदभार घेण्यास मुंढे इच्छुक नाहीत. त्यामुळे नियुक्ती होऊनदेखील मुंढे यांनी अद्याप पदभार घेतलेला नाही. या पार्श्‍वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांना विचारले असता त्यांनी वरील शब्दांत नाराजी व्यक्त केली. "मुंढे यांची पूर्णवेळ नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्याकडे अन्य कोणत्याही पदाचा कार्यभार देण्यात आलेला नाही,' असेही मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.

Web Title: pmp full time tukaram munde