
पुणे शहरातून पाच ठिकाणांहून रोज ४० नव्हे, तर ३५ वातानुकूलित बस विमानतळ मार्गावर सोडल्या जातात. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत या मार्गावरून पीएमपीला ४१ लाख ८६ हजार उत्पन्न मिळाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे.
तीन महिन्यांत केवळ ४१ लाख ८६ हजार रुपयांचे उत्पन्न; प्रशासनाचा दावा
पुणे - शहरातून पाच ठिकाणांहून रोज ४० नव्हे, तर ३५ वातानुकूलित बस विमानतळ मार्गावर सोडल्या जातात. नोव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यांत या मार्गावरून पीएमपीला ४१ लाख ८६ हजार उत्पन्न मिळाल्याचा दावा पीएमपी प्रशासनाने केला आहे. मात्र या तीन महिन्यांत या ३५ बसची किती किलोमीटर धाव झाली, हे मात्र प्रशासनाने स्पष्ट केले नाही.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पीएमपीने शहरात पाच ठिकाणी वातानुकूलित बससेवा सुरू केली आहे. गेल्या तीन महिन्यांत या मार्गावरून पीएमपीला ३९ लाख ४७ हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. मात्र त्यापोटी ४ कोटी ७५ लाख रुपये खर्च आला. उत्पन्नाच्या जवळपास बारापट खर्च या मार्गावर येत असल्याचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर पीएमपीने पत्र पाठवून ही माहिती दिली.
मुलाच्या लग्नातील पाहुणचार धनंजय महाडिकांना महागात; तिघांवर गुन्हा दाखल
किफायतशीर दरात प्रवाशांना सेवा देऊन त्यांना आकर्षित करणे हा पीएमपीचा हेतू आहे. त्यामुळे ही योजना करताना कोणताही नफा मिळवणे, हा उद्देश पीएमपीचा नाही. दोन्ही महापालिकांकडून त्यासाठी अनुदान दिले जाते, असेही पत्रात म्हटले आहे. मात्र किती तोटा सहन करून मार्ग सुरू ठेवावेत, याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण पत्रात केलेले नाही.
अत्याधुनिक सेवेचा आढावा दर तीन महिन्यांनी घेतला जातो. त्यानुसार त्यामध्ये बदल करण्यात येतो, असा दावा पत्रात करण्यात आला आहे.
बंटी-बबलीची जोडी, करते घरफोडी; बारामतीत १९ गुन्ह्यांचा भांडाफोड
तुटीची माहिती दडवली
नऊ मीटर लांबीच्या इलेक्ट्रीक बससाठी प्रतिकिलोमीटर ४० रुपये ३२ पैसे, तर बारा मीटर लांबीसाठी ५८ रुपये ५० पैसे एवढा खर्च येतो. तीन महिन्यांत ठेकेदाराला किती पैसे मोजले, तसेच संचलनासाठी किती तूट येते, याची माहिती पीएमपीकडून दडवण्यात आली आहे.
Edited By - Prashant Patil