पीएमपीचा मासिक पास  आता ‘मी कार्ड’ स्वरूपात

पीएमपीचा मासिक पास  आता ‘मी कार्ड’ स्वरूपात

पुणे - प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरलेला पीएमपीचा १४०० रुपयांचा मासिक पास आता एक जूनपासून ‘मी कार्ड’मध्ये रूपांतरित होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षात सुमारे पावणेदोन लाख प्रवाशांनी या पासचा वापर केला होता.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अमर्यादित प्रवासासाठी पीएमपीचा १४०० रुपयांचा मासिक पास प्रवाशांमध्ये लोकप्रिय आहे. हा पास आता ‘मी कार्ड’मध्ये रूपांतरित झाल्यावर अन्य पासही टप्प्याटप्प्याने ‘मी कार्ड’मध्ये रूपांतरित होणार आहेत. त्यासाठी शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील ३९ पास केंद्रांवर पीएमपी प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली आहे. ‘मी कार्ड’साठीचा अर्ज पास केंद्रावर मिळणार आहे. त्यासाठी ११८ रुपये प्रवाशांना भरावे लागणार आहेत. त्यासोबत संबंधित व्यक्तीचा फोटो आणि आधार कार्डची झेरॉक्‍स प्रत द्यावी लागणार आहे. हा पास मिळाल्यावर नूतनीकरणासाठी एरवी भरावे लागणारे २० रुपये शुल्क आता पुढे द्यावे लागणार नाही. ‘मी कार्ड’ आता ऑनलाइनही मिळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

या ठिकाणी करा नोंदणी
या पास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी पीएमपीच्या www.pmpml.org  या संकेतस्थळावर Online Services विभागात pass MI Card विभागात नोंदणी करायची आहे. पुढील टप्प्यात दैनंदिन पासही ‘मी कार्ड’ स्वरूपात मिळणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com