esakal | पुणेकरांनो फक्त 5 रुपयांत फिरा; पीएमपीची दसऱ्यापासून खास भेट
sakal

बोलून बातमी शोधा

pmp bus pune

पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा भार पेलणाऱ्या पीएमपीने दसऱ्यानिमित्त प्रवाशांसाठी खास भेट दिली आहे.

पुणेकरांनो फक्त 5 रुपयांत फिरा; पीएमपीची दसऱ्यापासून खास भेट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा भार पेलणाऱ्या  पीएमपीने दसऱ्यानिमित्त प्रवाशांसाठी खास भेट दिली आहे. यामध्ये प्रवासांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे. पुणे महानगर प्रादेशिक परिवहनने बुधवारी नवीन योजना जाहीर केली. नव्या योजनेनुसार फक्त 5 रुपयांमध्ये 5 किमी प्रवास करता येणार असून दसऱ्यापासून ही योजना सुरू होणार आहे. 

प्रवाशांची संख्या लक्षात घेता या योजनेनुसार दर पाच मिनिटांनी गाड्या उपलब्ध होतील अशी माहिती  पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी सांगितले. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,  पीएमपीचे संचालक शंकर पवार उपस्थित होते.

अटल प्रवासी योजना असं नाव असून यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यापर्यंत प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी ही सुरुवात करण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमध्ये मध्यवर्ती ठिकाण निश्चित करून त्याच्या पाच किमी अंतरामध्ये वेगवेगळ्या अंतरांवर गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. त्यामुळे प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करता येईल.

हे वाचा - अवघ्या ४८ तासांत रिक्षाचालकाच्‍या खुनाचे आरोपी जेरबंद

पुणे महापालिका मुख्य इमारत, पिंपर चिंचवडमध्ये चिंचवड ही ठिकाणे मध्यवर्ती असतील. पुणे महापालिकेपासून 5 किमी अंतराच्या परिघात 9 मार्ग निश्चित केले आहेत. या मार्गावर फक्त 5 रुपयांमध्ये प्रवास करता येणार आहे. 

नव्या योजनेनुसार गाड्या उपलब्ध करून देण्यासाठी  पीएमपीने कमी उत्पन्न असलेल्या काही मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. तसंच यामध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही आणि  पीएमपीच्या उत्पन्नावर  परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचंही राजेंद्र जगताप म्हणाले.

loading image