esakal | Video : पीएमपी आजपासून पुन्हा रस्त्यावर धावणार; 190 मार्गांवर 421 बसेस
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML_Bus

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली पीएमपी बससेवा पुन्हा सुरु करताना काही अटींवर परवानगी देण्यात आली आहे. 

Video : पीएमपी आजपासून पुन्हा रस्त्यावर धावणार; 190 मार्गांवर 421 बसेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या पाच महिन्यांपासून बंद पडलेली पीएमपीची प्रवाशांसाठीची वाहतूक सेवा गुरुवारपासून दोन्ही शहरांत सकाळी सहा वाजल्यापासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीच्या 421 बस एकूण 190 मार्गांवर धावतील. प्रवाशांसाठी प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर उपलब्ध असेल. 65 वर्षांवरील प्रवाशांना बसमध्ये प्रवेश करण्यास बंदी असेल.

पुणे : 'न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग'पद्धतीनं सुरू झालंय भुयारी मेट्रोचं काम!​

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पीएमपीची प्रवासी वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद झाली होती. दोन्ही शहरांतील अत्यावश्‍यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी 25 मार्चपासून फक्त वाहतूक सुरू आहे. मात्र, लॉकडाउन शिथिल झाल्यावर विमान, रेल्वे, एसटी, रिक्षा आणि कॅब वाहतूक सुरू झाली आहे. परंतु, पीएमपीला वाहतूक सुरू करण्यासाठी परवानगी मिळत नव्हती.

या पार्श्‍वभूमीवर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्यावर 20 ऑगस्ट रोजी दोन्ही महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात 3 सप्टेंबरपासून वाहतूक सुरू करण्याचे ठरले. दोन्ही महापालिकांडून या बाबतचे अधिकृत पत्र मिळाल्यावर वाहतूक सुरू करण्यासाठी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी बुधवारी प्रशासनाला सूचना दिल्या.

हॉटेल व्यावसायिकांचे 'वाजले की बारा'; लॉकडाउनच्या नव्या नियमावलीतही परवानगी नाहीच!​

प्रत्येक बस दिवसातून दोन वेळा सॅनिटाईज करण्यात येईल. तसेच शहरातील प्रमुख स्थानकांवर प्रवाशांना उभे राहण्यासाठी मार्किंग करण्यात आले आहे. तेथेच प्रवाशांनी उभे राहवे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्वारगेट, महात्मा गांधी स्थानक, हडपसर, डेक्कन जिमखाना, पुणे स्टेशन, पुणे मनपा, विश्रांतवाडी, वाघोली, कात्रज, वारजे माळवाडी, निगडी, चिंचवड गाव, पिंपळे गुरव, भोसरी, सांगवी, पिंपरी चौक येथील पास केंद्र रविवार वगळता सकाळी सात ते दुपारी दोन दरम्यान उघडी राहतील, असे पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक अनंत वाघमारे यांनी स्पष्ट केले आहे.

चारित्र्याच्या संशयावरून 'त्याने' पत्नीला पुलावरून नदीत ढकलले; संगमपुलाजवळ घडली घटना​

बस प्रवासासाठी सूचना
- 10 वर्षांखालील मुले आणि 65 वर्षांवरील नागरिकांना बसमध्ये प्रवेश नसेल.
- बसमध्ये फक्त 22 प्रवासी असतील.
- प्रवाशांना मास्कशिवाय बसमध्ये प्रवेश मिळणार नाही.

मिनी बसच्या खरेदीबाबत अनिश्‍चितता
लॉकडाउनच्या काळात पीएमपीचे जबर आर्थिक नुकसान झाले आहे. सुमारे 250 कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा पीएमपीला झाला आहे. त्यामुळे आगामी काळात पीएमपीपुढे आर्थिक आव्हान असेल. तसेच नव्या बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रस्तावही सुमारे दोन महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान, शहराच्या मध्यभागातील प्रवाशांसाठी पुणे महापालिका मिनी बस खरेदी करणार होती. मात्र, त्याबाबतही आता अनिश्‍चितता निर्माण झाली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image