esakal | पीएमपी प्रवाशांना प्रवासाचे ‘मी कार्ड’ बदलावे लागणार
sakal

बोलून बातमी शोधा

PMP Bus

पीएमपी प्रवाशांना प्रवासाचे ‘मी कार्ड’ बदलावे लागणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - बस प्रवासासाठी (Journey) वापरात असलेले ‘मी कार्ड’ (Mi Card) आता पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधील (Pimpri Chinchwad) प्रवाशांना तातडीने बदलावे (Change) लागणार आहे. कारण कार्डची सेवा बदलणाऱ्या कंपनीत बदल झाला आहे. त्यामुळे पीएमपीच्या प्रवाशांना पुन्हा पास केंद्रांवर जावे लागणार आहे. एक ऑगस्टपासून नवे ‘मी कार्ड’ प्रवाशांना वापरता येईल. (PMP Passengers Change the Mi Card Journey)

प्रवासी सध्या वापरत असलेले ‘मी कार्ड’ तांत्रिक कारणांमुळे बंद करण्यात आले आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील तसेच उपनगरातील ज्येष्ठ नागरिक पास (किंमत ५०० रुपये), जनरल पास (किंमत १४०० रुपये), तसेच पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेतील कर्मचारी पास (किंमत ७०० रुपये) आता बदलावा लागणार आहे. या पासधारकांना त्यांच्याकडील जुने मी-कार्ड व आधार कार्डची छायांकित प्रत घेवून १९ ते २६ जुलै दरम्यान नव्या मी कार्डसाठी नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणी केलेल्या प्रवाशांना पास केंद्रांवरूनच १ ऑगस्टपासून जुने मी-कार्ड जमा करून नवे मी कार्ड पीएमपीकडून मोफत मिळणार आहे. प्रवाशांना १ ऑगस्टपर्यंत जुन्या मी कार्डद्वारे प्रवास करता येईल, असे पीएमपीच्या सहव्यवस्थाकीय संचालक चेतना केरूरे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी 'क्‍लोजर रिपोर्ट' नाही, अजूनही तपास सुरूच

या पास केंद्रांवर नव्या मी कार्डसाठी सकाळी ८ ते दुपारी २ दरम्यान प्रवाशांना नोंदणी करता येईल. - १) पुणे मनपा बिल्डींग, २) हडपसर, ३) कोथरूड डेपो, ४) वारजे माळवाडी, ५) कात्रज, ६) विश्रांतवाडी, ७) पुणे स्टेशन मोलेदिना, ८) वाघोली, ९) स्वारगेट, १०) खडकी बाझार, ११) डेक्कन जिमखाना, १२) निगडी, १३) भोसरी शिवाजी चौक, १४) पिंपरी रोड चौक, १५) चिंचवड गाव

दुपारी २ ते रात्री ८ दरम्यान खुली राहणारी पासकेंद्रे - १) हडपसर, २) वारजे माळवाडी, ३) कात्रज, ४) पुणे मनपा बिल्डींग, ५) पुणे स्टेशन मोलेदिना, ६) स्वारगेट ७) भोसरी शिवाजी चौक, ८) निगडी

loading image