esakal | पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा "क्‍लोजर रिपोर्ट' नाही, अजूनही तपास सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

Pooja Chavan

पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी 'क्‍लोजर रिपोर्ट' नाही, अजूनही तपास सुरूच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पूजा चव्हाण (Pooja Chavan) आत्महत्या प्रकरणासंबंधी (Suicide Case) पुणे पोलिसांनी (Police) अद्याप कोणत्याही प्रकारचा "क्‍लोजर रिपोर्ट' (Closer Report) न्यायालयात (Court) सादर केलेला नाही, अजूनही संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. घटनेच्या सहा महिन्यानंतरही पोलिसांकडून या प्रकरणाचा "तपास सुरू आहे' इतकेच उत्तरे मिळत असल्याची सद्यस्थिती आहे. दरम्यान, पुजाच्या आई-वडीलांनी "आत्महत्या प्रकरणी कोणावरही आरोप नाहीत, आत्महत्येनंतर घडलेला प्रकार हा राजकीय नाट्य आहे' असा जबाब वानवडी पोलिसांना दिला आहे. (Pooja Chavan Suicide Case Police Closer Report Inquiry)

वानवडीजवळील महमदवाडी येथे 7 फेब्रूवारीला पूजा चव्हाण या तरुणीने इमारतीवरुन उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. दरम्यान, या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप करीत विरोधी पक्षांनी राज्यमंत्री संजय राठोड यांना धारेवर धरले होते. त्यानंतर राठोड यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसरीकडे या प्रकरणाबाबत वानवडी पोलिसांकडे विचारणा केल्यानंतर, त्यांच्याकडून तपास सुरू आहे, इतकेच उत्तरे देण्यात येत होती.

हेही वाचा: अजित पवारांनी विचारलं झाडाचं नाव; वन अधिकाऱ्यांची बोलती बंद

याच प्रकरणामध्ये पूजा चव्हाणच्या आई-वडीलांनी 15 दिवसांपुर्वी वानवडी पोलिस ठाण्यात येऊन आपला जबाब नोंदविला. त्यामध्ये 'आपल्या मुलीच्या आत्महत्येबाबत कोणालाही जबाबदार धरले नाही, तसेच मुलीच्या मृत्युनंतर घडलेला प्रकार हा राजकीय नाट्य आहे.' असे त्यांनी आपल्या जबाबामध्ये नोंदविले आहे. त्याआधारेच राठोड यांना "क्‍लिन चीट' मिळाल्याची अफवा पसरली. तेवढ्यावर न थांबता काही दिवसांपासून राठोड यांची मंत्रीमंडळात पुन्हा वर्णी लागणार असल्याची चर्चा रंगू लागल्या.

या पार्श्‍वभुमीवर, संबंधीत प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन त्याचा अहवाल (क्‍लोजर रिपोर्ट) सादर झाला आहे का ? असा प्रश्‍न परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी असा कुठलाही अहवाल सादर झालेला नाही. तसेच संबंधीत प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे, असे स्पष्ट केले.

हेही वाचा: मराठा आरक्षणासाठी कायद्यात बदल करावा - रामदास आठवले

फॉरेन्सिक अहवाल प्राप्त, मात्र काहीही सांगू शकत नाही !

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणासंदर्भात सुरूवातीपासूनच पुणे पोलिस टिकेचे धनी ठरले होते. विशेषतः या प्रकरणाची माहिती बाहेर पडू नये, यासाठी पोलिसांनी घेतलेली विशेष काळजी आणि एकूणच तपासाबाबत विरोधकांकडून वेळोवेळी प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यातच 'फॉरेन्सिक अहवाला प्राप्त झाला आहे. मात्र आम्ही काहीही सांगू शकत नाही' अशी उत्तरे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली.

loading image