पीएमपी प्रवाशांना आता मासिक पासमुळे मिळणार दिलासा ! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 17 September 2020

पीएमपीच्या संचालक मंडळाने मार्च 2020 मध्ये वन रूट पास साठी 24 दिवसांऐवजी 22 दिवसांसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे मार्गाच्या अंतरानुसार पासचे दर ठरविले जातात. त्यामध्ये एका मार्गावर दोन बाजूंच्या प्रवासासाठी वीस रुपये शुल्क लागत असेल तर त्या शुल्काची 24 दिवसांसाठी आकारणी करून महिन्याचा पास दिला जात होता

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) एका ठराविक रूपये मार्गाचा पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा वर देण्याचा निर्णय घेतला आहे. 'वन रूट पास साठी यापूर्वी २४ दिवसांची शुल्क आकारणी  केली जात होती, ती आता २२ दिवसांची केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना यापुढे पाससाठी कमी पैसे मोजावे लागणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पीएमपीच्या संचालक मंडळाने मार्च 2020 मध्ये वन रूट पास साठी 24 दिवसांऐवजी 22 दिवसांसाठी शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारणपणे मार्गाच्या अंतरानुसार पासचे दर ठरविले जातात. त्यामध्ये एका मार्गावर दोन बाजूंच्या प्रवासासाठी वीस रुपये शुल्क लागत असेल तर त्या शुल्काची 24 दिवसांसाठी आकारणी करून महिन्याचा पास दिला जात होता. आता 22 दिवसांचे आकारणी होणार आहे त्यामुळे वन रूट पासमध्ये 40 रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत बचत होणार आहे. त्यानुसार आता पासचे दर 440 रुपये आणि 660 रुपये तसेच 880 रुपये आणि अकराशे रुपये असतील. आता नवीन छपाईचे पाच प्राप्त झाल्याने 16 सप्टेंबरपासून या पासची विक्री सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या लॉकडाऊनच्या काळातील पासना दुसऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधितांनी प्रवाशांनी 17 ते 22 सप्टेंबर कालावधीत पास केंद्रांवर जुने पास घेऊन जावे, तेथे कार्यवाही केली जाईल, प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता. १६) दिवसभरात कोरोना रुग्णांची काय आहे आकडेवारी पहा सविस्तर

कमी अंतरासाठीही नवा पास
कमीत कमी पाच रुपये तिकीट असलेल्या मार्गांसाठी यापूर्वी वन रुट पास देण्यात येत नव्हते. यापूर्वी १० रुपये, १५ रुपये, २० रुपये आणि २५ रुपये यानुसार वन रूट पास दिला जात होता. प्रवासी संघटनांच्या मागणीनुसार आता पाच रुपये तिकीट दरासाठी देखील वन रूट पास दिला जाणार आहे. त्याचे मासिक शुल्क २२० रुपये असणार आहे.

पुणे झेडपी कोरोना रुग्णांत राज्यात 'अव्वल'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP passengers will now get relief due to monthly pass