पीएमपीचे पंचिंग पास आजपासून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुणे - विद्यार्थी, कष्टकरी आणि महिलांना उपयुक्त ठरणारे पंचिंग पासचे वितरण स्वातंत्र्य दिनापासून करण्याची घोषणा पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी मंगळवारी केली. 

पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पंचिंग पास रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याबद्दल विविध स्वयंसेवी संघटनांनी आंदोलने केली होती. त्याची दखल घेऊन पीएमपीच्या संचालक मंडळाने पंचिंग पास सुरू करावा, असा ठराव मंजूर केला होता; तसेच पीएमपी प्रशासनाने त्याबाबत आढावा घेऊन निर्णय घेऊ, असे म्हटले होते. त्यानुसार १५ ऑगस्टपासून पंचिंग पास सुरू करण्यात येणार आहे.

Web Title: PMP Punching Pass Bus