पीएमपीच्या प्रवासाबद्दल महिलांनी मांडल्या व्यथा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे - तेजस्विनी बसमध्ये ज्येष्ठ आणि अपंग प्रवासी महिलांसाठी आसने आरक्षित ठेवा, प्रवाशांची सुरक्षितता जोपासण्यासाठी वाहक-चालकांनी पुढाकार घ्याव्या आदी मागण्या करीत प्रवासी महिलांनी प्रशासनासमोर व्यथा मांडली. 

पीएमपीने प्रवासी महिलांसाठी आयोजित ‘सुसंवाद दिन’ उपक्रमास महापौर मुक्ता टिळक, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महिलांसाठीच्या विशेष बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी डॉ. गोऱ्हे यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी दिला. 

शहरात ८ मार्चपासून महिलांसाठी तेजस्विनी बससेवा सुरू करण्यात आली आहे. त्यांना अधिक चांगली सेवा पुरविण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे, असे पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी सांगितले. पीएमपी प्रवासी मंचच्या आशा शिंदे यांनी निवेदनाद्वारे विविध समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणल्या. यावर उपाययोजना करण्याचे आश्‍वासन गुंडे यांनी दिले. या प्रसंगी मेघना झुझुम यांनी ‘व्हय मी सावित्रीबाई बोलतेय’ हा एकपात्री नाट्यप्रयोग सादर केला. विधी अधिकारी नीता भरमकर यांनी आभार मानले. 

Web Title: PMP women passenger journey issue