Velhe Crime : भर रस्त्यात पीएमपीएल बस चालकास मद्यपी युवकांकडून बेदम मारहाण; एक अटक, दुसरा फरार

आंबवणे (ता. वेल्हे) येथील तळेकर वस्तीजवळ विंझर कडून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपीएल चालकास भर रस्त्यात बस अडवुन मद्यधुंद युवकांनी चालकाला बेदम मारहाण केली.
Beating
Beatingesakal

वेल्हे, (पुणे) - आंबवणे (ता. वेल्हे) येथील तळेकर वस्तीजवळ विंझर कडून पुण्याकडे जाणाऱ्या पीएमपीएल चालकास भर रस्त्यात बस अडवुन मद्यधुंद युवकांनी चालकाला बेदम मारहाण केली. त्यात बस चालक तेजस चंद्रकांत गायकवाड (वय ३५, रा. माऊलीनगर, शेलार मळा, पुणे). यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली आहे.

या प्रकरणी वेल्हे पोलिसांनी, निलेश पंढरीनाथ सरपाले (वय-२६, रा. माळवाडी, सोंडे सरपाले, ता. वेल्हा, जि. पुणे) यास अटक केली असून, दुसरा हल्लेखोर श्रेयस काळुराम सरपाले (वय-२०, रा. सोंडे सरपाले) हा फरार झाला आहे.

हा प्रकार काल बुधवारी (ता. २०) रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला.

या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम तपास करत आहेत.

विंझर (ता. वेल्हे) येथुन बस पुण्याकडे चालली होती. आंबवणे गावाजवळ बसच्या पुढे चाललेली वॅगनर कार (क्रमांक एम एच १२, पी क्यु ७१३७) ही वेडीवाकडी चालली होती. त्यामुळे बस चालक तेजस गायकवाड यांनी हार्न वाजवुन कार बाजुला घेण्याचा इशारा दिला.

कार चालक मद्यधुंद अवस्थेत कार चालवत होता. चालकासह दोन अल्पवयीन मुले व एक युवक असे चौघे जण होते. आंबवणे येथील तळेकर वस्ती स्टॉपजवळ पीएमपीएल बस समोर कार आडवी उभी करून बस रोखुन धरली. त्यामुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले. कार मधील युवक श्रेयस सरपाले याने बस चालक तेजस गायकवाड यांना जोरदार शिवीगाळ, दमदाटी करत बिअरची बाटली उचलुन बसच्या टायरवर फोडली.

त्यानंतर बस चालकाच्या केबीनचा दरवाजा उघडुन तो जोरात आपटत चालकाला बेदम मारहाण केली. मारहाणीत चालक गायकवाड यांच्या उजवे कानाला गंभीर दुखापत झाली. प्रवाशांनी जोरदार आरडाओरडा केल्याने श्रेयस सरपाले व इतर कार मधुन पसार झाले.

या प्रकरणी बस चालक गायकवाड यांनी काल रात्री निलेश व श्रेयस सरपाले या दोघांविरोधात वेल्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मद्यधुंद युवकांनी भर रस्त्यात प्रवासी बस अडवुन धिंगाणा घालत बस चालकाला मारहाण करण्याचा गंभीर प्रकार घडल्याने परिसरामध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.

आंबवणे गावामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक हायस्कूल असल्याने या परिसरामध्ये शाळा सुटण्याच्या वेळेमध्ये अनेक मद्यपी तसेच टवाळखोर फिरत असतात. याबाबत वेल्हे पोलिसांना वारंवार सूचना देऊनही त्याच्याकडे वेल्हे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अनेक नागरिकांनी केला असून, तालुक्यात अवैध धंद्याचा सुळसुळाट यासंदर्भात दैनिक 'सकाळ' मध्ये बातमी प्रसिद्ध होऊनही कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com