Pune Crime : पीएमपीएल बस चालक वाहकाला वाहतूक पोलिसांची मारहाण

बस थांब्यावरून बस हलवावी या कारणावरून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसाने पीएमपीएल बस चालक व वाहक याना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला.
Ramjan Pathan
Ramjan PathanSakal
Summary

बस थांब्यावरून बस हलवावी या कारणावरून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसाने पीएमपीएल बस चालक व वाहक याना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला.

वाघोली - बस थांब्यावरून बस हलवावी या कारणावरून शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या वाहतूक पोलिसाने पीएमपीएल बस चालक व वाहक याना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. रिक्षा चालकांच्या सांगण्यावरून पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप चालकाने केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी शिक्रापूर येथे घडली.

रमजान हुसेन पठाण ( वय 35, रा वाघोली ) असे चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पठाण हे रविवारी वाघोली येथून कारेगाव ही बस घेऊन गेले. शिक्रापूर येथील बस थांब्यावर बस थांबविल्यानंतर प्रवाशी चढले व उतरले. तेथे काही रिक्षा उभ्या होत्या. त्यांनी बस चालकाला बस हलविण्यास सांगितले. बस चालकाने बस पुढे घेतली.

मात्र ती बस तेथून हलवावी असे सांगत होते. बस थांबा आहे वेळ झाल्यावर निघेल असे चालकाने त्यांना सांगितले. त्यांच्यात तू तू मी मी झाली. त्यांनी वाहतूक पोलिसाला बोलवून आणले. वाहतूक पोलिसनेही बस हलविण्यास सांगितले. मात्र चालकाने तेच सांगितले. वाहतूक पोलिसाने चालक व वाहक याना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांना मारहाण केली व चालकांवर गुन्हा दाखल केला. शिक्रापूर पोलिसानी चालकाला नोटिस बजावून शिरूर येथील न्यायालयात हजर राहण्यास सांगितले.

याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

'आम्ही येथे रिक्षा थांबविण्यासाठी पैसे मोजतो. असे रिक्षा चालक सांगत होते. बस थांबा असल्याने तेथे बस थांबविली होती. मात्र रिक्षा चालकांशी आर्थिक संबध असल्यानेच आम्हाला मारहाण करण्यात आली.

- पठाण, चालक, पीएमपीएल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com