पीएमपी बसचे ब्रेक फेल, वाहनांना धडक दिल्याने महिलेसह दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PMPML bus brakes fail accident near Vishrambagwada on Kumthekar Road two injured pune

पीएमपी बसचे ब्रेक फेल, वाहनांना धडक दिल्याने महिलेसह दोघे जखमी

पुणे : पीएमपीएमएल बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे बसचालकाने दुचाकी, रिक्षासह चार वाहनांना धडक दिली. या अपघातात महिलेसह दोघेजण जखमी झाले. ही घटना कुमठेकर रस्त्यावर विश्रामबागवाड्याजवळ बुधवारी सायंकाळी घडली. पीएमपीएमलची बस (क्रमांक एमएच-१२ एचबी ०५३६) ही डेक्कन, मंडई मार्गे हडपसरच्या दिशेने जात होती. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कुमठेकर रस्त्यावर बसचे अचानक ब्रेक फेल झाले. त्यामुळे बसचालकाने दोन रिक्षा आणि दोन दुचाकींना पाठीमागून धडक दिली.

त्यात एका महिलेसह दोघेजण जखमी झाले असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. विश्रामबागवाड्याजवळ बसच्या धडकेमुळे एक रिक्षा बस आणि भिंतीच्यामध्ये अडकली होती. विश्रामबाग पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. सायंकाळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. त्यामुळे अपघात झाल्यानंतर कुमठेकर रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोलिसांनी बसचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Pmpml Bus Brakes Fail Accident Near Vishrambagwada On Kumthekar Road Two Injured Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top