पुणे : हॉटेलमध्ये घुसली पीएमपीएमएलची बस (व्हिडिओ)

पुणे : हॉटेलमध्ये घुसली पीएमपीएमएलची बस (व्हिडिओ)

धायरी : वडगाव बुद्रुक येथील सिंहगड महाविद्यालयाजवळील सिंहगड फाऊंटन हॉटेलमध्ये पीएमपीएमएलची बस घुसली. संबंधित बसचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला. ही घटना आज (गुरुवार) सायंकाळी चारच्या सुमारास घडली.

सिंहगड महाविद्यालयाकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसला हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. यावेळी बसमध्ये चालक सोपान कांबळे (वय 42 रा मोहामदवाडी, हडपसर, पुणे) आणि वाहक आणि इतर दोन ते तीन प्रवाशी बसमध्ये होते. या अपघातात हॉटेलचे सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले.  

दरम्यान, हॉटेलमालक पांडुरंग खंडु मोरे (वय 39 रा. तुकाई नगर वडगाव बुद्रुक) यांनी फिर्याद दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com