पुण्यात 'पीएमपीएमएल' बसला आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

बसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सीएनजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पुणे- वारजे माळवाडी परिसरात आज (गुरुवार) सकाळी पीएमपीएमएलच्या बसला आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएलची बस वारजेहून चिंचवडच्या दिशेने निघाली होती. यावेळी बसला आग लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी बसला बाजूला घेऊन उभी केली. दरम्यान, बसला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. सीएनजीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: pmpml bus fire in pune

टॅग्स