PMPML Pune Darshan : पीएमपीएमएलच्या ‘पुणे दर्शन’ व ‘पर्यटन बस’ सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

PMPML Tourism : पीएमपीच्या ‘पुणे दर्शन’ बस सेवेचा प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून जून महिन्यात ६.४८ लाख रुपये उत्पन्न झाले आहे.
PMPML Pune Darshan
PMPML Pune DarshanSakal
Updated on

पुणे : ‘पीएमपी’तर्फे सुरू असलेल्या पुणे दर्शन व पर्यटन बस सेवेला गेल्या महिन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. जूनमध्ये ६ लाख ४८ हजार एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

प्रवाशांचा प्रवास आरामदायी, सुलभ व माफक दरात होण्याच्या दृष्टीने तसेच हौशी पर्यटक, भाविक-भक्त यांना धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पुणे महानगरपरिवहन महामंडळाकडून ‘पुणे दर्शन’ व ‘पर्यटन बस’ सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार, सुरू करण्यात आली होती. इतर दिवशी १५ ते २० प्रवाशांनी बुकिंग केल्यास कोणत्याही दिवशी बस सोडण्यात येते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com