
पुणे : प्रवासी वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढविण्यासाठी व संख्या मोजण्यासाठी पीएमपी प्रशासन बसमध्ये ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वापर करणार आहे. प्रत्येक बसमध्ये चार कॅमेरे बसविले जाणार आहेत. एकूण १६५० बसमध्ये सहा हजार ६०० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी मिळेल असे ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.