‘पीएमआरडीए’ने जागेसाठी मोजले ४० कोटी

Metro
Metro

मेट्रो कारशेड उभारण्यासाठी भूसंपादन; १८ हेक्टरवर प्रकल्प
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेड (डेपो) पहिल्या टप्प्यात चाळीस कोटी रुपये मोबदला देऊन साडेचार हेक्‍टर जागा ताब्यात घेतली आहे. कारशेडसाठी एकूण १८ हेक्‍टर जागा लागणार आहे.

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रोचे काम हाती घेतले आहे. यासाठी माण येथे १८ हेक्‍टर जागेवर डेपो उभारण्यात येणार आहे. ही जागा खासगी जमिनी मालकांची आहे. ती ताब्यात घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात १५ शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील साडेचार हेक्‍टर जागा पीएमआरडीएला देण्यास संमती दिली आहे. त्यापोटी जमिनी मालकांना ४० कोटी ७६ लाख रुपयांचा मोबदला देण्यात येणार आहे. ही जागा लवकरच लवकर ताब्यात यावी, यासाठी 
पीएमआरडीएकडून स्वतंत्र पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून ही जागा ताब्यात घेण्यात येणार आहे. जमिनी मालकांकडून खरेदीखत करून घेतल्यानंतर त्यांना तातडीने जागेचा मोबदला रोख स्वरूपात दिली जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले. कारशेडसाठी उर्वरित जागा लवकरात लवकर ताब्यात कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पीएमआरडीएने कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com