पिंपळे गुरवमध्ये पीएमपी बस चालक, वाहकाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 February 2021

गोपाळा रामदास दातीर (वय 39, रा.भुजबळ आळी, चाकण) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालक व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी : रस्त्याचे काम चालू असल्याने एका दुचाकीस्वाराला दुचाकी हळू चालवण्यास सांगितल्यावरून दुचाकीस्वार व त्याच्या साथीदाराने मिळून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचालक व वाहकाला मारहाण केली. ही घटना विजयनगर, पिंपळे गुरव येथे घडली.

गोपाळा रामदास दातीर (वय 39, रा.भुजबळ आळी, चाकण) यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीचालक व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे पीएमपीमध्ये  वाहक पदावर कार्यरत आहेत. ते मंगळवारी (ता.16) सायंकाळी भोसरी-भेकराईनगर (बस क्रमांक 148) या बसवर कर्तव्यावर होते.

दरम्यान, साडे सातच्या सुमारास ते पिंपळे गुरवकडून भोसरीकडे जात असताना पिंपळे गुरव येथील विजयनगर जवळ रस्त्याचे काम सुरु असल्याने बसचालक दीपक वाघमारे यांनी एका दुचाकीचालकाला दुचाकी हळू चालवण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वार व त्याच्या साथीदाराने बस थांबवून दोघांनी बसचालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. दरम्यान, त्यांचे भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी दातीर गेले असता आरोपींनी दातीर यांनाही हाताने मारहाण केली. याबाबत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pmt Bus driver was beaten in pimple gurav