पुण्यात पीएमटीच्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात

पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या ११ प्रकल्पास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मान्यता दिली.
पुण्यात पीएमटीच्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात
Updated on
Summary

पीएमटीच्या बसमध्ये महिलांसाठी सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या ११ प्रकल्पास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मान्यता दिली.

पुणे - पीएमटीच्या बसमध्ये (PMP Bus) महिलांसाठी (Women) सुरू केलेल्या स्वच्छतागृहाच्या (Toilet) ११ प्रकल्पास स्थायी समितीने (Standing Committee) आज (मंगळवारी) मान्यता दिली.

पीएमटीच्या वापरात नसणाऱ्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा असणार आहेत. या बसेसमध्ये टॉयलेट आणि वॉश बेसिन हे एका भागात तर दुसऱ्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री याची सुविधा असले. यामध्ये प्रती महिला पाच रुपये शुल्क घेतले जाणार आहे.

सिंध सोसायटी औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल बाणेर, आनंद नगर सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान बोपोडी, आरटीओ फुले नगर, लोहगाव बसस्टॉप, संविधान चौक विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेल.

पुण्यात पीएमटीच्या बसेसचे रूपांतर महिला स्वच्छतागृहात
भोर : नवगुरु इंस्टिट्युटमधील 90 विद्यार्थिनींना विषबाधा

डायलिसिस उपचारांसाठी उपकरणे खरेदी

कोंढवा येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे प्रसुतीगृहात डायलेसिसचे उपचार करण्यासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय उपकरणे खरेदी करण्यासाठी स्थायी समितीने मान्यता दिली. या प्रसुतीगृहात दहा खाटांचे डायलिसिस उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी डायलिसिस मशिन, बेड, मॉनिटर आदीची खरेदी आणि प्रकल्प चालविण्यासाठी १४ लाख ६५ हजार रुपयांच्या निविदेला मान्यता दिला.

घनकचरा व्यवस्थापनासाठी आठ कोटी

घनकचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी महापालिकेच्या पाच विभागांत बसविण्यात आलेली यंत्रणा, कचरा खेचून घेणाऱ्या मशिन आणि टिपर चालविणे याच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली. यासाठी आठ कोटी तीन लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली असून, पुढील चार वर्षांसाठी हा करार केला आहे.

३१ कंत्राटी डॉक्‍टरांना मुदतवाढ

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ३१ कंत्राटी डॉक्टरांना तीन महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने या लाटेचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी या डॉक्टरांना मुदतवाढ स्थायी समितीने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com