भोर : नवगुरु इंस्टिट्युटमधील 90 विद्यार्थिनींना विषबाधा

अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली आहे. यातील बहुतांश मुली या परराज्यातील आहेत.
Poisoning
PoisoningSakal

भोर (पुणे) : पुणे- सातारा महामार्गावरील खोपी (ता. भोर) येथील फ्लोरा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (Flora Institute Of Technology) या संस्थेच्या परिसरात असलेल्या नवगुरुकुल पुणे कॅम्पस या नावाने असलेल्या इन्स्टिट्यूटमधील ९० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा (Poisoning) झाली आहे. विषबाधा झालेल्यांपैकी ८ जणींना भोर येथील उपजिल्हा रुग्णालयात तर, अन्य आठ जणींना ससून रुग्णालयांत (Sassoon Hospital) उपचारासाठी दाखल केले आहे. उर्वरित ७४ जणींना किरकोळ उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. यापैकी बहुतांशी मुली या परराज्यातील असून त्या संगणक शाखेचे शिक्षण घेत आहेत. सर्व मुलींची प्रकृती स्थिर असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय तिडके यांनी सांगितले.

या नवगुरूकूल पुणे कॅम्पस संस्थेत एकूण २०२ मुली शिक्षण घेत असून, या सर्वजणी तेथे वसतिगृहात राहत आहेत. या सर्व जणींनी रविवारी (ता. २६) रात्री पनीरची भाजी, पुरी आणि भात असे जेवण स्वतःच तयार केले होते. हे जेवण केल्यानंतर त्यांना दुसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. २७) सकाळपासून उलटी व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याचे निदर्शनास आले. सोमवारी दुपारपर्यंत बाधित मुलींची संख्या वाढू लागली. त्यामुळे ९० मुलींना उपचारासाठी भोरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे ५८ मुलींवर किरकोळ उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

Poisoning
आधी 'त्या' बोलेरो गाड्यांची थकबाकी भरा; सावंतांचा नितेश राणेंना टोला

उर्वरित १६ पैकी आठ जणींना उपचारासाठी दाखल करून घेण्यात आले आणि उर्वरित आठ जणींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. भोर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत साबणे व वैद्यकीय अधिकारी डॉ. लिंगेश्वर बेरुळे यांनी त्यांच्यावर त्वरित उपचार सुरु केले. मुलींना मळमळ, जुलाब, उलट्या व पोटदुखीचा त्रास होत असल्याचे साबणे यांनी सांगितले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे व भोरचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींची विचारपूस केली. नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना फ्लोरा इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले आहे. विषबाधेचे नक्की कारण शोधण्यासाठी पाणी व अन्नाचे नमुने घेण्यात येणार आहेत. शिवाय संबंधित ग्रामपंचायतीलाही योग्य खबरदारी घेण्याची सूचना केली आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत संस्थेच्या मालकाचे नाव व पत्ता समजू शकला नाही. केवळ तेथील एका महिला प्रकल्प अधिकाऱ्याचा संपर्क मिळाला. पण त्या महिलेने खूप उद्धट

Poisoning
भुदरगड : रस्त्यावरील झाडांची बेसुमार कत्तल; प्रशासनाचे दुर्लक्ष

उत्तरे दिल्याचे आरोग्य विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, यासंदर्भात १०८ या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्‍वर शेळके म्हणाले, ‘‘दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास दूरध्वनीद्वारे या विषबाधेच्या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी तातडीने रुग्णवाहिका दाखल झाल्या. त्यातून २४ जणींना भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. यापैकी काही जणींना ससूनमध्ये दाखल केले आहे. उलटी, मळमळ व पोटदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार या मुली करत होत्या.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com