poet actor kishor kadam believe artist judge can give justice to the society
poet actor kishor kadam believe artist judge can give justice to the societySakal

Pune News : कलावंत न्यायाधीश म्हणजे समाजाला न्याय - कवी-अभिनेते किशोरे कदम

आज आपल्या व्यवस्थेत संविधानातील अनेक गोष्टींचा नवा अन्वयार्थ लावला जात आहे. त्यामुळे न्यायाधीशांमधील नवीन तर्क मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यातील सृजनता जागृत होत आहे.

Pune News : आज आपल्या व्यवस्थेत संविधानातील अनेक गोष्टींचा नवा अन्वयार्थ लावला जात आहे. त्यामुळे न्यायाधीशांमधील नवीन तर्क मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यातील सृजनता जागृत होत आहे. अशा वातावरणात कलावंत न्यायाधीश समाजाला न्याय देऊ शकतो, असा विश्वास कवी-अभिनेते किशोरे कदम यांनी व्यक्त केला.

वल्लरी प्रकाशनाच्यावतीने जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या ‘घटाघटांचे रुप आगळे’ या कथासंग्रहाचे आणि ‘मयुरानंद’ या चित्रपुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी न्यायाधीश वेदपाठक, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कुलदीप धुमाळे, बबन पोतदार, प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर, उमाकांत दांगट, पोपटभाऊ बागमार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पाटणे म्हणाले, ‘वल्लरी प्रकाशनाचा 'घटाघटांचे रूप आगळे' हा कथासंग्रह न्या.वेदपाठक यांची जीवनसाधना आणि मूल्यनिष्ठा यांचा सुंदर अमृत कुंभ आहे. वाचकांना अंतर्मुख करणारी वैचारिक अस्वस्थता हे न्या. वेदपाठक यांच्या कथेचे बलस्थान आहे. कल्पकता, रंजकता आणि मानवता यांचा सुंदर मेळ त्यांच्या कथांतून घातलेला दिसतो.

न्यायाधीश सुनील वेदपाठक हे मागील तीस वर्षांपासून दररोज एक वेगळे मयूरचित्र रेखाटतात. त्यातील निवडक चित्रांचे ‘मयुरानंद’ हे चित्रपुस्तक आहे. ‘‘तीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष पिसारा फुलवून थुईथुई नाचणारा मोर मनात आणि हृदयात गेला. तेव्हापासून कोरलेला तो मोर साकारत आहे’’, अशा भावना वेदपाठक यांनी व्यक्त केल्या.

दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या साहित्य संमेलनाचं विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात, भारतात आणि जगभरात अनेक मराठी साहित्यविषयक उपक्रम होत असतात. विशेष म्हणजे सरकारदरबारी या उपक्रमांची कोणत्याही प्रकारची नोंद होत नाही.

मराठी भाषा जेव्हा अभिजात होईल, तेव्हा लेखक-प्रकाशकांना योजनांचे नियोजन करताना ही नोंद-माहिती उपयुक्त ठरणारी आहे. त्यासाठी साहित्य संस्था-संघटनांनी कृतीशील पाऊल उचलणं गरजेचं आहे, असं मत प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर यांनी व्यक्त केले.

गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, पुणे : पुस्तक प्रकाशन करताना डावीकडून प्रकाशक व्यंकटेश कल्याणकर, सौ. वेदपाठक, न्यायाधीश सुनील वेदपाठक, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, कवी सौमित्र, बबन पोतदार, कुलदीप धुमाळे, उमाकांत दांगट, पोपटभाऊ बागमार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com