बाबू गेनू यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट - आढळराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

महाळुंगे पडवळ - ‘‘देशभक्त हुतात्मा बाबू गेनू सैद यांचा अधिकृत फोटो व गॅजेटमधील माहिती येत्या दोन ते तीन दिवसांत उपलब्ध करून द्यावी.त्यानंतर केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडून लवकरात लवकर मान्यता घेऊन त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट काढले जाईल,’’ असे आश्‍वासन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले. 

महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथे हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानमार्फत बलिदान भूमी ते जन्मभूमी या पायी प्राणज्योत दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त पोलिस अधिकारी व जवानांच्या माता पित्यांचा सन्मान आढळराव पाटील यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते व कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानगुडे पाटील, रवींद्र करंजखेले, अरुण गिरे, सुनील बाणखेले, सागर काजळे, राजाराम बाणखेले, जवान चंदू चव्हाण, अनिकेत घुले, प्रवीण थोरात, हुतात्मा बाबू गेनू प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, सचिन चासकर उपस्थित होते. 

आढळराव पाटील म्हणाले, ‘‘राजगुरुनगर येथील बस स्थानकात खासदार निधीतून ५० लाख रुपये खर्च करून शहीद सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांचे स्मारक उभारले आहे. त्याप्रमाणे मंचरमध्ये दोन ते तीन गुंठे जागा उपलब्ध करून दिल्यास हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे भव्य स्मारक व पुतळा उभारण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. तसेच परळ येथील स्मारकासाठी शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी पाच लाख रुपयांचा निधी दिला आहे. मीही मार्चनंतर दहा लाख रुपये खासदार निधी उपलब्ध करून देईल. ज्या हुतात्म्यांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्यांचे भव्य दिव्य स्मारकउभारण्यासाठी सरकारकडे मागणी करणार आहे.’’ 

प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी बाबू गेनूंच्या शौर्याची माहिती दिली. सूत्रसंचालन तन्मय चिखले यांनी केले.

Web Title: Poist Ticket Shivajirao Adhalrao Patil