नीरा नदीकाठी अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

राजकुमार थोरात
Sunday, 4 October 2020

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्हाच्या कारभार हातामध्ये घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.

वालचंदनगर : निमसाखर (ता. इंदापूर) गावच्या हद्दीमध्ये नीरा नदीकाठी अवैध वाळूउपसा करुन वाहतूक करणाऱ्या वाहनावर वालचंदनगर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. एक ट्रॅक्टर, एक टिपर दोन ब्रॉस वाळूसह ८ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त करुन दोन चालकांवर वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्हाच्या कारभार हातामध्ये घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणे वाळू उपसा, दारुसह अवैध धंदेवाल्यांनी देशमुख यांचा धसका घेतला आहे. वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निमसाखर गावच्या नीरा नदी काठी अवैध वाळूउपसा सुरु असल्याची माहिती वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवार (ता.३) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकला.

तर एक नोव्हेंबरपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल; विनायक मेटे यांचा इशारा

यावेळी नीरा नदीकाठी वाळू उपसा वाहनामध्ये भरण्याचे काम सुरु असताना पोलिसांनी छापा टाकून एक टिपर व एक वाळू चाळणी करणारा ट्रॅक्टर ताब्यात घेतला.

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

यामध्ये सुमारे दोन ब्रॉस वाळू असून याप्रकरणी पोलिसांनी चालक  अक्षय भिमराव कांबळे व रणजित माणिक गोरवे (रा.दोघे,कळंब) यांच्यावर वाळू चोरी व पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी दाखल केला असून ८ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तपास साहय्यक फौजदार मोहन फाळके करीत आहेत.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police action on illegal sand dunes along Nira river