
Vadgaon Nimbalkar Police Seize Illegal Liquor, File Case Against Two
Sakal
-चिंतामणी क्षीरसागर
वडगाव निंबाळकर : निरा–बारामती मार्गावर निंबुत ता बारामती गावच्या हद्दीत बेकायदेशीर देशी विदेशी दारू वाहतूक करणारे वाहन वडगाव निंबाळकर पोलिसांनी पकडले. यामधील दोघांवर बेकायदेशीर दारू वाहतुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेली दारू आणि वाहन असा ११ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.