सिंघमचा इशारा मग काय, लगेचच हवेली पोलिसांची धडक कारवाई

निलेश बोरुडे
Friday, 23 October 2020

पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुगार, अवैध दारू, गांजा, अवैध रेती वाहतूक किंवा इतर बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिल्यानंतर हवेली पोलिस स्टेशन कडून अवैध व्यवसायांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह दोघांना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळून ताब्यात घेण्यात आले आहे तर गावठी दारू विक्रीसाठी घेऊन निघालेल्या एकाला गोऱ्हे बुद्रुक येथे सापळा रचून पकडण्यात आले आहे.

किरकटवाडी - पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जुगार, अवैध दारू, गांजा, अवैध रेती वाहतूक किंवा इतर बेकायदेशीर व्यवसाय आढळल्यास संबंधित पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिल्यानंतर हवेली पोलिस स्टेशन कडून अवैध व्यवसायांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. जुगाराच्या साहित्यासह दोघांना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळून ताब्यात घेण्यात आले आहे तर गावठी दारू विक्रीसाठी घेऊन निघालेल्या एकाला गोऱ्हे बुद्रुक येथे सापळा रचून पकडण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कुणाल प्रकाश शिंदे (वय 35,रा.खानापूर ता. हवेली), संदीप मनोहर भडाळे (वय 35, रा.वडगाव, सिंहगड रोड) अशी नांदेड फाट्याजवळील कॅनॉल वर जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून 1415 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

पुण्यातील प्रकार; कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करत बिलांत ७८ लाख जादा आकारल्याचे उघड

तसेच  एका इंडिका कार मधून गावठी दारूची वाहतूक होत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर हवेली पोलिस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोऱ्हे बुद्रुक येथे सापळा रचून विपुल मधुकर गायकवाड (वय 36, रा. खानापूर) याला 175 लिटर गावठी दारूसह अटक केली आहे. गावठी दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येत असलेली इंडिका कारही जप्त करण्यात आली आहे.

प्रॉपर्टी कार्डला आता कायदाच ठरत आहे अडसर

हवेली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दिलीपराव आंबेकर, पोलीस नाईक रवींद्र नागटिळक, पोलीस कॉन्स्टेबल संतोष भापकर,पोलीस कॉन्स्टेबल गणेश धनवे,होमगार्ड शांताराम राठोड होमगार्ड सुशिल गाभने, कमलेश जोशी,चालक महेंद्र चौधरी यांनी ही कारवाई केली. अवैध धंद्यांबाबत नागरिकांना माहिती मिळाल्यास तात्काळ हवेली पोलिस स्टेशन शी संपर्क साधावा, माहिती देणार्‍यांची नावे गुप्त ठेवण्यात येतील असे आवाहन पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी केले आहे.

मोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी!

'पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रामध्ये कसल्याही प्रकारचे अवैध धंदे चालू दिले जाणार नाहीत. अवैध व्यावसायिक आणि गुन्हेगारांवर कडक कायदेशीर कारवाई  करण्यात येत आहे.लोकसहभाग वाढवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासन प्रभावी प्रयत्न करत आहे.'
- अभिनव देशमुख, पोलिस अधिक्षक, पुणे ग्रामीण

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police action in kirkitwadi crime