Crime News : पैठण कारागृहातून पळालेल्या आरोपीला साथीदारासह पोलिसांनी ठाेकल्या बेड्या

खुनाच्या गुन्हयात झालेली होती जन्मठेपेची शिक्षा, दोन चोरीचे गुन्हेही उघडकीस, 6 लाखाचा मुद्देमाल जप्त
police action on accused escaped from Paithan Jail two cases of theft property seized
police action on accused escaped from Paithan Jail two cases of theft property seized sakal

इंदापूर : खुनाच्या गुन्हयात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना पैठण कारागृहातून 2019 मध्ये फरार झालेल्या आरोपीला साथीदारासह बेड्या ठोकन्यात इंदापूर पोलिसांना यश आले.त्यासह दोन चोरीचे गुन्हे उघडकीस आणत त्यांच्याकडून 6 लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. इंदापूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाबत अधिक माहिती अशी की, आरोपी नामे अमोल अंबादास बनकर (वय 39 वर्षे,रा.काटी इंदापूर जि.पुणे) याने सन 2010 मध्ये आपल्या साथीदारास एक ग्रामसेवक असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून केला होता. त्याअंतर्गत त्याच्यावर नातेपुते पोलीस ठाणे (जि.सोलापूर) येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यात मुख्य आरोपी अमोल बनकर यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपी अमोल बनकर हा पैठण कारागृहात खुनाच्या गुन्हयात शिक्षा भोगत असताना सन 2019 मध्ये कारागृहातून पळून आला. तो कारागृहातून पळून आल्यामुळे त्याच्यावर पाचोड पोलीस ठाणे (जि.छत्रपती संभाजी नगर) येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून गेली 4 वर्षे फरार होता.

आरोपी अमोल बनकर इंदापूर मध्ये येणार असल्याबाबत गुन्हे शोध पथकास गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून गुन्हे शोध पथकाने आरोपी अमोल बनकर यास ताब्यात घेवून त्याच्याकडे कसून तपास केला असता त्याने त्याने तीन साथीदार आदेश बाळू बोराटे (वय २३ वर्षे रा. काटी ता.इंदापूर), शुभम महादेव इनामे (रा. काटी, तां. इंदापूर)

गणेश रामचंद्र इनामे (वय 22 वर्षे रा. नरूटवाडी, ता. इंदापूर) यांच्यासह वरकुटे ता.इंदापूर येथील एक दुकान फोडून त्यातील वस्तू चोरी केल्याचा तसेच पळसदेव ता. इंदापूर येथून दोन जर्सी गाय चोरी केल्याचे गुन्हे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन जर्सी गाय, दुकानातील चोरी केलेल्या वस्तू, एक पिक अप, एक एच एफ डिलक्स मोटार सायकल असा एकूण 6 लाख रूपयाचा मुददेमाल हस्तगत केला.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक ग्रामिण अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईट, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, नागनाथ पाटील, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जाधव, प्रकाश माने, पोलीस नाईक सुकुमार भोसले, सलमान खान पोलीस कॉन्टेबल नंदु जाधव,गजानन वाळे, विकास राखुंडे यांनी केली. त्यांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com