पोलिसांकडून नागरीकांना आता 'आई-बाबा आणि... शपथ'; काय आहे प्रकरण?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

  • कोरोना असतानाही विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांना दगडुच्या भाषेत 'टाईमपास' न करण्याचा सल्ला

पुणे : कोरोनामुळे घराबाहेर पडु नका, असे कितीही वेळा सांगितले नागरिक काही एकेनात, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी आता नागरीकांना दगडुच्या भाषेत "आई-बाबा आणि ......ची शपथ" घातली आहे, तसेच मास्क घातलेल्या प्राजु व दगडुमध्ये 6 फुटाचे अंतर ठेवण्यास सांगुन घराबाहेर "टाईमपास" न करण्याचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

तुम्हाला "टाईमपास" हा मराठी चित्रपट आठवतोय का ? तो नाही का दगडु आपल्या हटके स्टाईलने प्राजुला इम्प्रेस करतो, तिला प्रपोज करताना "आई-बाबा आणि साईबाबाची शपथ" घालतो. कोरोनाची बाहेर गंभीर परिस्थिती असताना, पुणे, मुंबईसमवेत महाराष्ट्रतील पोलिस नागरीकांना घराबाहेर पडु नको, असे गेली साडेतीन महीने ओरडून सांगत आहेत, तरीही नागरीक विनाकारण घराबाहेर पडण्याचे काही थांबत नसल्याची चिन्हे आहेत.

आता पोलिसांनी इतके सांगुनही नागरीक काही ऐकेनात. घराबाहेर पडायचे काही थांबेनात. त्यामुळे पोलिसांनी आता "टाईमपास" या मराठी चित्रपटातील दगडु आणि त्याच्या आवडत्या "आई-बाबा आणि साईबाबा शपथ" या संवादाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. दगडु व प्राजु या दोघाचे मास्कचा वापर केलेले आणि दोघामध्ये 6 फुटाचे अंतर ठेवण्याचा सल्ला ही पोलिसांनी दिला आहे.
-------------
पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती आणि नियोजनबद्ध धावपळ; वाचा तुम्हाला माहिती नसलेल्या सुप्रिया सुळे
-------------
खूशखबर ! भारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार
-------------
महाराष्ट्र पोलिसांनी हे छायाचित्र आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केले असून अवघ्या काही मिनिटातच दगडु-प्राजुच्या जोडीला आणि दगडुच्या आवडत्या "आई-बाबा आणि साईबाबा शपथ" या संवादाला नागरीकांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police advise dont leave the house for no reason despite being a corona