Rahul gandhi chhatron ki goonj Event in Pune
sakal
पुणे - लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी काही अटी-शर्तींसह परवानगी दिली आहे. कार्यक्रमस्थळी आक्षेपार्ह फलक, चित्र, तसेच धार्मिक भावना दुखाविणारे वक्तव्य करू नये, या अटींवर पोलिसांनी परवानगी दिली आहे. आज, शनिवारी (ता. २२) ‘एसएसपीएमएस’ प्रशालेच्या मैदानावर दुपारी साडेचार ते रात्री साडेनऊ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.