बारामतीत न्यायमंदिरासमोर पोलिस व वकील यांच्यातच... 

मिलिंद संगई
Friday, 15 May 2020

सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज न्यायालयाच्या आवारात पोलिस व वकील यांच्यात हमरीतुमरी झाली.

बारामती (पुणे) : सरकारी कामात अडथळा आणल्याच्या गुन्ह्यात एका वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज न्यायालयाच्या आवारात पोलिस व वकील यांच्यात हमरीतुमरी झाली. 

खेडमध्ये आढळला पहिला कोरोना रुग्ण, पदाधिकाऱ्याने केली अशी चूक...  

एका पोलिसाकडून न्यायालयाच्या आवारात व्हिडिओ शूटिंग करण्यावर काही वकिलांनी आक्षेप घेतला. या नंतर पोलिस व वकिलांमध्ये शाब्दिक चकमकी घडल्या. मात्र, शब्दाने शब्द वाढत गेल्याने प्रकरण धक्काबुक्कीपर्यंत गेल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडत असल्याने परिस्थिती नियंत्रणात राहावी, या साठी पोलिसांनी बळाचा वापर केला. काही वकिलांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेले होते. मात्र, नंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी व ज्येष्ठ वकील यांच्यात चर्चा झाल्यानंतर प्रकरण संपुष्टात आले. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणात अनेक वकिलांना मात्र पोलिसांच्या काठ्यांचा प्रसाद मिळाला. एका वकिलाच्या कानालाही या प्रकरणी जखम झाली आहे. या प्रकरणी पोलिस व वकील यांच्यात काही दिवसानंतर संयुक्त बैठक घेण्याचेही ठरल्याची माहिती आहे. 

 

 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police and lawyers clash in front of Baramati court