बारामती : डीजेचा त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, रुग्णालयाती रुग्ण या सर्वांनाच त्रास होतो, कान व मेंदूला त्याचा त्रास होतो, त्या मुळे डीजेविरहीत उत्सव साजरे करावेत, असे आवाहन पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी केले. .बारामती विभागातील गणेशोत्सव मंडळांच्या शांतता समितीच्या बैठकीत संदीपसिंह गिल बोलत होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसिलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी पंकज भुसे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक विलास नाळे, चंद्रशेखर यादव, वैशाली पाटील यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते..संदीपसिंह गिल यांनी या प्रसंगी वृक्षारोपण करणे, अंमली पदार्थांचे सेवन रोखणे, बालविवाहाच्या विरोधात भूमिका घेणे, रक्तदानाची चळवळ वृध्दींगत करा, ग्रंथालय सुरु करण्यासह विधायक उपक्रम गणेश मंडळांनी राबवावेत, असे आवाहन केले. प्रत्येक मंडळाने आपल्या मंडपात सीसीटीव्ही बसवावेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.या गणेशोत्सवात लेझरचा वापर करणा-या मंडळांवर शंभर टक्के कारवाई केली जाणार आहे, लेझर लाईटने डोळयांना इजा होते, ही बाब विचारात घेता पोलिस कारवाई करणारच, असे गणेश बिरादार यांनी सांगितले. डीजेबाबत न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करुन पोलिस कारवाई करतील, असा इशाराही त्यांनी दिला. मंडळांनी विधायक उपक्रम हाती घ्यावेत अशी सूचनाही केली..वैभव नावडकर यांनीही डीजे ऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे आवाहन केले. या प्रसंगी सुरेंद्र जेवरे, प्रवीण परदेशी, शेखर पाटील, साधू बल्लाळ, विशाल जाधव, रहमान शेख, नीलेश धालपे यांनी विचार मांडले. प्रास्ताविकात विलास नाळे यांनी पार्श्वभूमी विशद केली..या प्रसंगी बारामती विभागातील गणेश मंडळांना त्यांच्या कामगिरीसाठी पारितोषिके प्रदान केली गेली. पोलिस ठाणेनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पुढील प्रमाणे- बारामती शहर- महात्मा गांधी तरुण मंडळ, मारवाड पेठ, जय जवान तरुण मंडळ, गुनवडी चौक, अखिल महावीर पथ तरुण मंडळ, बारामती तालुका- अनंत युवा प्रतिष्ठान, सूर्यनगरी, योध्दा युवा गणेशोत्सव मंडळ, इच्छापूर्ती गणेश मंडळ, बारामती, माळेगाव पोलिस ठाणे- श्री दत्त सार्वजनिक तरुण मंडळ, माळेगाव, शिवशक्ती सार्वजनिक तरुण मंडळ, सांगवी, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान, माळेगाव, वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे- गुरुदत्त तरुण मंडळ, को-हाळे बुद्रुक, श्री स्वामी समर्थ तरुण मंडळ, को-हाळे, अष्टविनायक तरुण मंडळ, सुपे पोलिस ठाणे- एकता तरुण मंडळ, सुपे, महात्मा फुले मित्रमंडळ, का-हाटी, नवजीवन तरुण मंडळ..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.